dinvishesh 4 august 2023

    १४ फेब्रुवारी घटना

    व्हॅलेंटाईन दिन

    २०२२: कॅनडा – कोविड-१९ महामारीच्या आदेश आणि निर्बंधांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करत असलेल्या लोकांना रोकण्यासाठी, पंतप्रधान जस्टीन ट्रूदेऊ यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आपत्कालीन कायदा लागू केला.
    २००३: नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या सरस्वती सन्मानासाठी निवड.
    २०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
    १९८९: ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.
    १९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.
    १९४६: पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
    १९४५: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
    १९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.
    १८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.
    १८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.
    १८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.

    १४ फेब्रुवारी जन्म

    १९५२: सुषमा स्वराज – दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या – पद्म विभूषण (निधन: ६ ऑगस्ट २०१९)
    १९५०: कपिल सिबल – वकील आणि केंद्रीय मंत्री
    १९४७: फाम तुआन – अंतराळात जाणारे पहिले व्हिएतनामी नागरिक आणि पहिले आशियाई व्यक्ती
    १९३३: मधुबाला – अभिनेत्री (निधन: २३ फेब्रुवारी १९६९)
    १९२५: मोहन धारिया – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री (निधन: १४ ऑक्टोबर २०१३)
    १९१४: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (निधन: ९ ऑगस्ट १९७६)
    १८८५: सैयद जफरुल हसन – भारतीय तत्त्वज्ञ (निधन: १९ जून १९४९)
    १४८३: बाबर – पहिला मुघल सम्राट आणि संस्थापक (निधन: २६ डिसेंबर १५३०)

    १४ फेब्रुवारी निधन

    १९७५: ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म: २२ जून १८८७)
    १९७५: पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक (जन्म: १५ ऑक्टोबर १८८१)
    १९७४: श्रीकृष्ण रातंजनकर – भारतीय शास्त्रीय गायक – पद्म भूषण (जन्म: १ जानेवारी १९००)
    १४०५: तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (जन्म: ८ एप्रिल १३३६)