दिनविशेष : २० जानेवारी २०२३; उद्योगपती सर रतनजी जमशेदजी टाटा यांची जयंती

    २० जानेवारी घटना

    २००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
    १९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
    १९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र या संस्थेची स्थापना करण्यात आली.
    १९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला.
    १९४४: दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.
    १९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
    १८४१: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
    १७८८: इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनाऱ्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.

    २० जानेवारी जन्म

    १९७२: भूपेश पांड्या – भारतीय चित्रपट अभिनेते (निधन: २३ सप्टेंबर २०२०)
    १९६०: आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक
    १९४९: अजित दास – भारतीय चित्रपट अभिनेते (निधन: १३ सप्टेंबर २०२०)
    १९४०: कृष्णम राजू – भारतीय अभिनेते आणि खासदार (निधन: ११ सप्टेंबर २०२२)
    १९३०: बझ आल्ड्रिन – चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर
    १८९८: मास्टर कृष्णराव – भारतीय गायक, अभिनेते व संगीतकार – पद्म भूषण (निधन: २० ऑक्टोबर १९७४)
    १८९८: कृष्णराव (फुलंब्रीकर) – नात मास्टर आणि गायक (निधन: २० ऑक्टोबर १९७४)
    १८८९: मसुरकर महाराज – महान देशभक्त आणि तपस्वी
    १८७१: सर रतनजी जमशेदजी टाटा – उद्योगपती (निधन: ५ सप्टेंबर १९१८)
    १८६१: काशीबाई गोविंदराव कानिटकर – पहिल्या मराठी स्त्री कथा-कादंबरीकार आणि सुधारक
    १७७५: आंद्रे-मरी ऍम्पियर – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (निधन: १० जून १८३६)

    २० जानेवारी निधन

    २००२: रामेश्वर नाथ काओ – भारतीय रिसर्च अँड ऍनॅलेसिस विंग (RAW) गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष (जन्म: १० मे १९१८)
    १९९३: आँड्रे हेपबर्न – अँग्लो-डच अभिनेत्री (जन्म: ४ मे १९२९)
    १९८८: अब्दुल गफार खान – भारतीय स्वातंत्र्यसैनिक – भारतरत्न (जन्म: ३ जून १८९०)
    १९८०: कस्तुरभाई लालभाई – भारतीय उद्योगपती, परोपकारी – पद्म भूषण (जन्म: १९ डिसेंबर १८९४)
    १९५१: ठक्कर बाप्पा – समाजसेवक (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
    १९३६: जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ३ जून १८६५)
    १८९१: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)