२२ नोव्हेंबर : १९४८ साली मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला.

  घटना.

  १८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

  १९४३: लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला.

  १९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.

  १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

  १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.

  १९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.

  १९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.

  १९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.

  १९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू.

  १९९७: नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.

  २००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.

  २०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.