२४ नोव्हेंबर : २००० साली भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.

    घटना.

    १४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.

    १७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.

    १८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.

    १८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.

    १९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.

    १९६३: जॉन एफ. केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हार्वे ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबी ने खून केला.

    १९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.

    १९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.

    १९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.

    १९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.

    १९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.

    १९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.

    १९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.

    १९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.

    २०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.