दिनविशेष : २६ जानेवारी २०२३, गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले

    २६ जानेवारी घटना

    भारतीय प्रजासत्ताक दिन

    २००१: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.
    १९९८: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.
    १९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.
    १९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
    १९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
    १९४२: दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.
    १९३३: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सुरुवात केली.
    १९२४: रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.
    १८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
    १८३७: मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.
    १६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.
    १५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.

    २६ जानेवारी जन्म

    १९५७: शिवलाल यादव – क्रिकेटपटू
    १९२५: पॉल न्यूमन – अभिनेते, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (निधन: २६ सप्टेंबर २००८)
    १९२१: अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (निधन: ३ ऑक्टोबर १९९९)
    १९२०: वसंत नायसादराय रायजी – भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार (निधन: १३ जून २०२०)
    १९१९: के. सी. इब्राहिम – भारतीय क्रिकेटपटू (निधन: १२ नोव्हेंबर २००७)
    १९१८: निकोला सीउसेस्कु – रोमेनियाचे पहिले अध्यक्ष (निधन: २५ डिसेंबर १९८९)
    १८९१: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे – बडोद्याचे राजकवी (निधन: १७ मार्च १९३७)
    १८३: लेडी जेन – चीनी सम्राज्ञी (निधन: ४ ऑगस्ट २२१)

    २६ जानेवारी निधन

    २०१५: आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार (जन्म: २४ ऑक्टोबर १९२१)
    १९६८: बापूजी अणे – लोकनायक (जन्म: २९ ऑगस्ट १८८०)
    १९५४: मानबेंद्रनाथ रॉय – भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक, क्रांतिकारक (जन्म: २१ मार्च १८८७)
    १८७९: जुलिया मार्गारेट कॅमेरॉन – भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार (जन्म: ११ जून १८१५)
    १८३१: संगोली रायन्ना – भारतीय योद्धा (जन्म: १५ ऑगस्ट १७९८)
    १८२३: डॉ. एडवर्ड जेन्नर – देवीची लस शोधणारे संशोधक (जन्म: १७ मे १७४९)
    १७३०: कवी श्रीधर – समाधी घेतली.