२६ सप्टेंबर : १९७३ साली ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

    घटना.

    इ.स.पू. ४६ : ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.

    १७७७ : अमेरिकन क्रांती–ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.

    १९०५ : अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख प्रकाशित केला.

    १९१० : त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशाभिमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.

    १९५० : इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

    १९५४ : जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ लोक मृत्युमुखी.

    १९६० : फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

    १९७३ : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

    १९८४ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

    १९९० : रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

    १९९७ : गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.

    २००१ : सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.

    २००९ : टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये ७०० लोक मृत्युमुखी.