dinvishesh panchang special day 28 may 2023 women get the right to vote in greece nrvb

२७ मार्च घटना

२०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
१९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन ऍम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.
१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.
१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१८५४: क्रिमियन युद्ध इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
१६६७: शिवरायांना सोडून गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले वनाव महंमद कुली खान ठेवले.

२७ मार्च जन्म

१९०१: कार्ल बार्क्स – डोनल्ड डकचे निर्माते हास्यचित्रकार (निधन: २५ ऑगस्ट २०००)
१८६३: हेन्री रॉयस – रोल्स-रॉयस लिमिटेडचे सहसंस्थापक (निधन: २२ एप्रिल १९३३)
१७८५: लुई १७ वा – फ्रान्सचा राजा (निधन: ८ जून १७९५)

२७ मार्च निधन

२०००: प्रिया राजवंश – हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९९७: भार्गवराम आचरेकर – संगीत नाटकातील अभिनेते व गायक
१९९२: शरदचंद्र वासुदेव चिरमुले – साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य
१९७९: फिलिप व्हिन्सेंट – विन्सेंट मोटारसायकल कंपनीचे संस्थापक (जन्म: १४ मार्च १९०८)
१९७८: कुंवर दिग्विजय सिंग – भारतीय फील्ड हॉकीपटू (जन्म: २ फेब्रुवारी १९२२)
१९६७: जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – झेक रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (जन्म: २० डिसेंबर १८९०)
१९५२: काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ११ जून १८९४)
१८९८: सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)