दिनविशेष दि. २७ डिसेंबर

घटना : 
१९११ : कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.
१९१८ : बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
१९४५ : २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.
१९४५ : कोरिया देशाची फाळणी झाली.
१९४९ : इंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५ : बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.
१९७८ : ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
२००४ : मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
२००७ : पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.