dinvishesh 4 august 2023

    १ फेब्रुवारी घटना

    जागतिक बुरखा हिजाब दिन

    २०१३: जागतिक बुरखा हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.
    २००४: मक्का हज यात्रेतील चेंगराचेंगरीत २५१ निधन तर २४४ लोक जखमी झाले.
    २००३: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी.
    १९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन ऍंडरसन याला फरारी घोषित केले.
    १९८१: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्याचेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसाचेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.
    १९७९: १५वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
    १९६६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
    १९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
    १९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
    १९४१: डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
    १८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
    १८८४: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
    १८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत.
    १६८९: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.

    १ फेब्रुवारी जन्म

    १९८२: शोएब मलिक – पाकिस्तानी क्रिकेटपटू
    १९७१: अजय जडेजा – भारतीय क्रिकेटपटू
    १९६०: जॅकी श्रॉफ – अभिनेते
    १९३९: डॉ. कल्लाम अंजी रेड्डी – डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक – पद्म विभूषण, पद्मश्री (निधन: १५ मार्च २०१३)
    १९३१: बोरिस येल्तसिन – रशियाचे पहिले अध्यक्ष (निधन: २३ एप्रिल २००७)
    १९२९: जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, कालनिर्णय कॅलेंडरचे संस्थापक (निधन: २० ऑगस्ट २०१३)
    १९२७: मधुकर हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक (निधन: २५ जानेवारी २०१५)
    १९२३: बेन व्हिडर – इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक (निधन: १७ ऑक्टोबर २००८)
    १९१७: ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक (निधन: २६ ऑगस्ट २०१२)
    १९०१: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेते (निधन: १६ नोव्हेंबर १९६०)
    १८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (निधन: ५ जानेवारी १९४३)

    १ फेब्रुवारी निधन

    २०१२: अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक
    २००३: कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १७ मार्च १९६२)
    १९८१: डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर – डग्लस एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक (जन्म: ६ एप्रिल १८९२)
    १९७६: वेर्नर हायसेनबर्ग – क् वांटम मॅकॅनिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
    १९४८: जतिंद्रमोहन बागची – भारतीय कवि आणि समीक्षक (जन्म: २७ नोव्हेंबर १८७८)