dinvishesh 4 august 2023

    २३ जानेवारी घटना

    २००२: वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण.
    १९९७: मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.
    १९७३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.
    १९६८: शीतयुद्ध उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.
    १९४३: दुसरे महायुद्ध ब्रिटिश सैन्याने लिबीयाची राजधानी त्रिपोली शहर जिंकले.
    १९३२: प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिंदी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.
    १८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर बनल्या.
    १५६५: विजयनगर साम्राज्याची अखेर

    २३ जानेवारी जन्म

    १९४७: मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
    १९३४: बरुण सेनगुप्ता – बंगाली पत्रकार (निधन: १९ जून २००८)
    १९३४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (निधन: ६ एप्रिल १८६४)
    १९२६: बाळासाहेब ठाकरे – हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख (निधन: १७ नोव्हेंबर २०१२)
    १९२०: श्रीपाद रघुनाथ जोशी – व्यासंगी लेखक
    १९१५: कमलनयन बजाज – भारतीय उद्योगपती (निधन: १ मे १९७२)
    १८९८: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक (निधन: १७ डिसेंबर १९५६)
    १८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस – भारतीय आझााद हिंद सेनाचे संस्थापक, क्रांतिकारक (निधन: १८ ऑगस्ट १९४५)
    १८१४: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (निधन: २८ नोव्हेंबर १८९३)

    २३ जानेवारी निधन

    २०१०: पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म: २ ऑक्टोबर १९२७)
    १९९२: ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर – भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक
    १९९१: पद्मराजन – भारतीय दिग्दर्शक आणि लेखक (जन्म: २३ मे १९२५)
    १९८९: साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार (जन्म: ११ मे १९०४)
    १९५९: विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित
    १९३१: ऍना पाव्हलोव्हा – द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेल्या रशियन बॅलेरिना (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१)
    १९१९: राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक (जन्म: २६ मे १८८५)
    १६६४: शहाजी राजे भोसले – यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती (जन्म: १८ मार्च १५९४)