
८ मार्च घटना
जागतिक महिला दिन
२०१६: पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.
१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.
१९७९: फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्कचे प्रकाशन केले.
१९७४: चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.
१९५७: घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
१९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.
१९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
१८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.
८ मार्च जन्म
१९७४: फरदीन खान – अभिनेते
१९६३: गुरु शरणसिंग – भारतीय क्रिकेटपटू
१९३१: मनोहारी सिंग – प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक (निधन: १३ जुलै २०१०)
१९३०: आरतीप्रभू – कवी, कादंबरीकार आणि नाटककार (निधन: २६ एप्रिल १९७६)
१९२८: वसंत अनंत कुंभोजकर – कथालेखक
१९२१: साहिर लुधियानवी – शायर व गीतकार (निधन: २५ ऑक्टोबर १९८०)
१८८६: एडवर्ड कालव्हिन केन्डॉल – जीवरसायन शास्रज्ञ
१८७९: ऑटो हान – जर्मन रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (निधन: २८ जुलै १९६८)
१८६४: हरी नारायण आपटे – भारतीय कादंबरीकार (निधन: ३ मार्च १९१९)
८ मार्च निधन
२०१७: जॉर्ज अँड्र्यू ओलाह – हंगेरियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: २२ मे १९२७)
१९८८: अमर सिंग चमकिला – भारतीय गायक-गीतकार (जन्म: २१ जुलै १९६०)
१९८०: मॅक्स मिईदींगर – हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते (जन्म: २४ डिसेंबर १९१०)
१९५७: बाळासाहेब खेर – मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री – पद्म विभूषण (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)
१९४२: जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)
१७०२: विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)