दिनविशेष : १९ जानेवारी २०२३, १९६६ साली इंदिरा गांधी यांनी भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला

    १९ जानेवारी घटना

    २००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
    २००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.
    १९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खान यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.
    १९८६: (cbrain) नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
    १९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.
    १९६६: इंदिरा गांधी – यांनी भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
    १९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.
    १९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.
    १९४९: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.
    १९४२: दुसरे महायुद्ध जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.
    १९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे यांना बिनतारी संदेश पाठवला.) अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.
    १८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.

    १९ जानेवारी जन्म

    १९३६: झिया उर रहमान – बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ३० मे १९८१)
    १९३५: सौमित्र चट्टोपाध्याय – भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते – पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: १५ नोव्हेंबर २०२०)
    १९२०: सझेवियर पेरेझ द कुइयार – संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणी
    १९१९: ओमप्रकाश मेहरा – भारतीय एअर मर्शल (निधन: ८ नोव्हेंबर २०१५)
    १९०६: मास्टर विनायक – चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते
    १८९८: वि. स. खांडेकर – भारतीय मराठी कादंबरीकार – पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २ सप्टेंबर १९७६)
    १८९२: चिंतामण विनायक जोशी – प्रसिद्ध विनोदी लेखक (निधन: २१ नोव्हेंबर १९६३)
    १८८६: सवाई गंधर्व – भारतीय शास्त्रीय गायक (निधन: १२ सप्टेंबर १९५२)
    १८०९: एडगर ऍलन पो – अमेरिकन गूढ व भयकथांचेलेखक व कवी (निधन: ७ ऑक्टोबर १८४९)
    १७३६: जेम्स वॅट – वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक

    १९ जानेवारी निधन

    २०००: एम. ए. चिदंबरम – भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)
    १९९०: ओशो – भारतीय तत्त्वज्ञानी (जन्म: ११ डिसेंबर १९३१)
    १९७८: बिजोन भट्टाचार्य – भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक (जन्म: १७ जुलै १९१७)
    १९६०: दादासाहेब तोरणे – मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक (जन्म: १३ एप्रिल १८९०)
    १९०५: देबेन्द्रनाथ टागोर – भारतीय तत्त्वज्ञानी (जन्म: १५ मे १८१७)
    १७५५: जीन पियरे क्रिस्टिन – सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे (जन्म: ३१ मे १६८३)