dinvishesh 4 august 2023

    १४ जानेवारी घटना

    भूगोलदिन

    २०००: ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
    १९९८: ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
    १९९४: मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
    १९४८: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
    १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
    १७६१: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसऱ्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलून गेला.

    १४ जानेवारी जन्म

    १९७७: नरेन कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर – पद्मश्री
    १९४२: योगेशकुमार सभरवाल – भारताचे ३६वे सरन्यायाधीश (निधन: ३ जुलै २०१५)
    १९२६: महाश्वेता देवी – भारतीय बंगाली लेखक, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या – पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २८ जुलै २०१६)
    १९२५: व्ही. कृष्णमूर्ती – भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २६ जून २०२२)
    १९२३: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (निधन: २५ ऑक्टोबर २००९)
    १९१९: कैफी आझमी – गीतकार (निधन: १० मे २००२)
    १९०८: द्वा. भ. कर्णिक – ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत
    १९०५: दुर्गा खोटे – मराठी अभिनेत्री (निधन: २२ सप्टेंबर १९९१)
    १८९६: चिंतामणराव देशमुख – भारताचे अर्थमंत्री (निधन: २ ऑक्टोबर १९८२)
    १८९२: दिनकर बळवंत देवधर – भारतीय क्रिकेटपटू (निधन: २४ ऑगस्ट १९९३)
    १८९२: दि. ब. देवधर – क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू (निधन: २४ ऑगस्ट १९९३)
    १८८३: निना रिकी – इटालियन-फ्रेंच फॅशन डिझायनर (निधन: ३० नोव्हेंबर १९७०)
    १८८२: रघुनाथ धोंडो कर्वे – भारतीय विचारवंत, समाजकारणी (निधन: १४ ऑक्टोबर १९५३)

    १४ जानेवारी निधन

    १७४२: धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)
    १७६१: पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)
    १७६१: पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन. (जन्म: २ मार्च १७४२)
    १८९८: इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.
    १९२०: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४)
    १९९१: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)
    २००१: माहितीपट निर्माते फली बिलिमोरिया यांचे निधन.