चटपटीत चहा जो मूड करेल रिफ्रेश,पोटही होईल साफ, जाणून घ्या रेसिपी

बनारसचा स्पेशल चहा कधी प्यायला आहात का? या चहाची चवही मस्त आणि हा आयोग्यासाठीही फायदेशीर! चला तर या चहाची रेसिपी जाणून घेऊयात...

  चहा हा अनेक भारतीयांसाठीचा एक अमृततुल्य पेय आहे. तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकारचे चहा ट्राय केले असतील मात्र आज आम्ही तुम्हाला अशा चहाबद्दल सांगणार आहोत ज्याचे नावदेखील तुम्ही याआधी ऐकले नसेल. हा चहा पिऊन तुमच्या पोटाला आराम तर मिळेलच पण तुमचा मूड देखील याने रिफ्रेश होईल. हा चहा चवीला तर कडक आहेच मात्र हा चहा पचनासही मदत करेल. या चहाचे नाव आहे ‘हाजमोला चहा’. ऐकायला जरी अनोखे वाटत तरी बनारसमध्ये या चहाची फार चर्चा आहे. आरोग्यासाठी हा चहा फायद्याचा मानला जातो त्यामुळे एकदा तरी या चहाची रेसिपी ट्राय करायला विसरू नका.

  बनारसचा प्रसिद्ध हाजमोला चहा
  वसलेले बनारस हे राज्य साहित्य, धर्म, संस्कृती आणि खाद्यपदार्थ यांनी समृद्ध आहे. प्रत्येकालाच बनारसला जाण्याची संधी मिळत नाही पण आज आम्ही तुमच्यासाठी बनारसच्या खास चहाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. बनारस स्पेशल हाजमोला चहा अगदी सहज आणि कमी वेळेत तयार होतो.

  हाजमोला चहा रेसिपी

  साहित्य:

  • 250 मिली पाणी
  • 1/4 टीस्पून चहा पावडर
  • 1 लहान चिमूटभर काळे मीठ
  • 1 चिमूटभर भाजलेले जिरे पावडर (भाजलेले आणि ग्राउंड जिरे)
  • 2- 3 हाजमोला गोळ्या (चवीनुसार)
  • 1 टीस्पून लिंबाचा रस (चवीनुसार)
  • 1 चमचे स्वीटनर

  कृती:

  • बनारस स्पेशल हाजमोला चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम वर दिलेले सर्व साहित्य तयार करा. यानंतर हाजमोला एका ग्लासमध्ये फोडून त्याचे लहान तुकडे अथवा पावडर बनवून घ्या ज्याणेंकरून ते चहामध्ये सहज विरघळेल
  • यानंतर गॅसवर एक पातेले ठेवा त्यात पाणी घाला आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्या आता यात लिंबाचा रस, चहाची पावडर, हाजमोला असे सर्व साहित्य टाकून द्या
  • सर्वकाही चहात टाकून झाल्यावर चहाला छान उकळी येऊ द्या, दोन तीन उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करा. असे केल्याने तुमचा चहा अधिक चांगला आणि कडक बनेल
  • आता चहा एका कपमध्ये काढा, वरून हवे असल्यास पुदिना टाका आणि हा चहा पिण्यासाठी सर्व्ह करा
  • चवीला हा चहा एकदम मस्त आणि चटपटीत लागतो. पावसाळ्याच्या दिवसांत तर हा चहा स्वास्थ्यासाठी फारच आरोग्यदायी ठरेल