रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी राहा ‘या’ सवयींपासून दूर, जाणून घ्या सविस्तर

मधुमेहाचा त्रास जाणवू लागल्यानंतर रक्तातील साखर वाढू लागते. शरीरामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर इतर आजार होण्याची शक्यता असते.

  देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तरुण वयाच्या मुलांना मधुमेहाचा त्रास होत असल्याने सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. बदलती जीवनशैली, अपुरी झोप, अवेळी जेवणे या सगळ्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. पूर्वीच्या काळी मधुमेहाचा त्रास वयाच्या ४० ते ४५ वर्षांनंतर जाणवू लागायचा मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे हा त्रास लहान वयातील मुलांनादेखील होत आहे. मधुमेहाचा त्रास जाणवू लागल्यानंतर रक्तातील साखर वाढू लागते. शरीरामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर आहारात बदल करणे गरजेचे आहे. तसेच काही गोष्टी टाळायला हव्या. चला तर जाणून घेऊया.

  रात्री उशिरा जेवणे:

  मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात पौष्टीक फळे, भाज्या इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. पण जर तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल तर ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. रात्री उशिरा जेवल्यानंतर पोटाला अन्न नीट पचले जात नाही. त्यामुळे पोटासंबंधित आजार वाढण्याची शक्यता असते.यामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तसेच मधुमेह देखील वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो संध्याकाळी ७ ते ८ वाजताच्या आधी जेवण्याचा प्रयत्न करावा.

  जेवल्यानंतर लगेच झोपणे:

  जेवण जेवल्यानंतर लगेच झोपू नये. जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची पातळी जास्त असेल तर जेवल्यानंतर लगेच झोपू नये. लगेच झोपल्यानंतर शरीरामध्ये कफ वाढतो. त्यामुळे जेवल्यावर २ ते ३ तासानंतर झोपावे. २ तासानंतर झोपल्याने जेवलेले अन्न पचन होते.

  साखर मैद्याचे पदार्थ खाणे टाळा:

  मधुमेहाच्या रुग्णांनी साखरेचे किंवा मैद्याचे पदार्थ खाऊ नये. आहारामध्ये सतत मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर मधुमेहाचा त्रास वाढत जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज वाढवणारे पदार्थ जास्त असतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.

  वेळेवर औषध न घेणे:

  मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी वेळेवर औषध घेतली पाहिजेत. वेळेवर औषध न घेल्यास मधुमेह व्यतिरिक्त इतर आजार होण्याची शक्यता असते. योग्य आहारासोबतच औषध घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. औषधांसोबत घरगुती उपाय देखील केले पाहिजेत.