
2 चमचे मीठ एक लीटर गरम पाण्यात टाका. मोजे त्यात भिजवत ठेवा. तुमचे मोजे जर खराब झाले असतील तर डिटरजन्टही त्यात घालू शकता. फक्त पाणी फार गरम असू नये, नाही तर मोज्यातील इलॅस्टिक खराब होईल.
सतत मोजे वापरल्यामुळे त्याला दुर्गंधी ( socks)यायला सुरुवात होते. मोजे धूळ आणि घाणीच्या संपर्कात आल्याच्या ठराविक वेळेनंतर काळे पडू लागतात. तुमचे मोजेही जर काळे पडत असतील आणि त्यामुळे दुर्गंधी येत असेल तर मोज्यांची दुर्गंधी दूर होण्यासाठी या काही टिप्स…
– 2 चमचे मीठ एक लीटर गरम पाण्यात टाका. मोजे त्यात भिजवत ठेवा. तुमचे मोजे जर खराब झाले असतील तर डिटरजन्टही त्यात घालू शकता. फक्त पाणी फार गरम असू नये, नाही तर मोज्यातील इलॅस्टिक खराब होईल. मोज्यातून येणारा दुर्गंध या उपायने दूर होईल.
– हायड्रोजन परऑक्साइडचा वापर पांढऱ्या मोज्यांना धुण्यासाठी करू शकता. हे मोजे साफ तर करतातच शिवाय दुर्गंधीलाही दूर करतात. एक लीटर कोमट पाण्यात चतुर्थांश कप हायड्रोजन परऑक्साइड मिसळून काही वेळासाठी त्यात मोजे भिजवत ठेवा. ते मोजे यानंतर डिटरजन्टने धुवून काढा.
– मोज्यातील दुर्गंधी बेकिंग सोडाही दूर करू शकतो. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस पाण्यात मिसळून त्यात मोजे भिजवत घाला. मोज्यावरील काळे डाग निघून जातात. – – लिंबात अॅसिड असते ज्यामुळे मोज्यातील दुर्गंध दूर होते. लिंबाचा रस एक लीटर पाण्यात घालून मोजे धूवा. यामुळे मोज्यातली दुर्गंधीही निघून जाईल.