उन्हाळयात अमृताचा स्वाद! जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात मसालेदार अन्न खावेसे वाटत नसेल आणि हलका आरोग्यदायी आहार घ्यायचा असेल तर 'हा' एक उत्तम पर्याय आहे.

  उन्हाळ्यात विशेष काही पदार्थ खाणे शरीरासाठी फायदेकारक ठरते. उन्हाळ्यात आंबा, कलिंगड, टरबूज असे अनेक फळे बाजारात येत असतात. याचबरोबर आपण आज काही पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, जे उन्हाळ्याच्या दिवसात जरूर खाल्ले पाहिजे. उन्हाळ्यात (Summer) आपली पचनशक्ती मंदावते. यामुळे कोशिंबीर अर्थातच सलाड (Healthy Recipe), उन्हाळ्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. तुम्हाला मसालेदार जेवणासोबत काही हलके हवे असेल तर सलाडचा आहारात सामावेश करू शकता.

  सलाडचे फायदे:
  सलाड म्हणजेच कोशिंबीर मध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वे असतात. हे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांपासूनही शरीराचे रक्षण होते. कोशिंबीर, मग ते फळांचे असो किंवा कच्च्या भाज्यांचे, पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. रोजच्या आहारात याचा समावेश केल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. .कोबी-टोमॅटोची भाजी कोशिंबीर केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायीही आहे.

  साहित्य:

  १ कप कोबी
  १ कप टोमॅटो
  १/१ कप कांदा
  २ चमचे हिरवे धणे
  १/४ चमचा काळी मिरी पावडर
  काळे मीठ चवीनुसार

  कृती:

  सर्वप्रथम कोबी नीट किसून घ्या.
  त्यानंतर टोमॅटो आणि कांदा बारीक कापून घ्या.
  यानंतर एका भांड्यात चिरलेली कोबी, टोमॅटो आणि कांदा टाका.
  त्यावर वरून काळी मिरी पावडर आणि हिरवी धणे घालून सर्वकाही नीट एकजीव करून घ्या.
  आता तुमचा कोबी-टोमॅटो सलाड तयार आहे.
  यावर मीठ आणि काळी मिरी पावडर शिंपडा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
  तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावर लिंबू आणि चाट मसालाही घालू शकता.

  दही भात
  दही भात हे एक पारंपरिक जेवण मानले जाते. बऱ्याच काळापासून दहीभात खाण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात दही भात एक उत्कृष्ट भोजन ठरेल, हे पचनासाठी देखील चांगले असते. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आणि सहज बनला जातो. दही भात हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे. ही एक झटपट रेसिपी आहे.

  कृती:

  दही भात बनवण्यासाठी सर्वप्रथम तेल, मिरची, मोहरी, दही आणि तांदूळ घ्या.
  यानंतर प्रथम तांदूळ घेऊन त्याला मीठ घालून चांगले शिजवून घ्या.
  नंतर एक कढई घेऊन त्यात कढईत तेल घाला.
  मग त्यात मिरची आणि मोहरीची फोडणी द्या.
  मिरच्या आणि बिया शिजत असताना, त्यात दही आणि तांदूळ घालून सर्व नीट एकजीव करावे.
  यानंतर तेलात शिजवलेले तांदूळ घाला.
  सर्वकाही नीट एकजीव करा आणि मग थंड होऊ द्या.
  आता तुमचा दही भात तयार आहे.

  आमरस

  फळांचा राजा आंबा हा कोणाला आवडत नाही. उन्हाळ्याच्या दिवसातील आंबा हा सर्वात जास्त खाणारा फळ आहे. आंब्याला फळांचा राजा म्हणूनही ओळखले जाते. उन्हाळ्यात आंब्याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. हे तुमचे शरीर थंड ठेवते.

  कृती:

  आमरस बनवण्यासाठी सर्वप्रथम काही पिकलेले आंबे घेऊन ते स्वछ धुवून घ्या.
  यांनतर आंब्यांतील पल्प काढून घ्या.
  नंतर आंब्याच्या पल्पमध्ये थोडी साखर घालून मिक्सरमध्ये ते चांगले फिरवून घ्या.
  आता तयार आंब्याच्या मिश्रणात १ चमचाभर वेलची पूड घालून सर्वकाही नीट ढवळून घ्या.
  आता तुमचा आमरस तयार आहे. तुम्ही हा आमरस काही वेळ फ्रिजमधे ठेवू शकता, ज्याणेंकरून तुम्हाला थंडगार आमरसाचा आस्वाद घेता येईल.