फंगल इन्फोक्शन झाल्यास ही काळजी घ्या…

    पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहे. बुरशीजन्य संसर्ग सामान्यत: एरिथेमॅटस रॅशेस म्हणून ओळखला जातो. जे नाण्यासारख्या गोल किंवा अंगठीच्या आकाराचे वर्तुळ तयार होऊन तेथे खाज येते. सामान्यत: शरीराच्या गुप्तांगात, त्वचेच्या दुमडल्या भागात, मांडीच्या सांध्यात, बगले मध्ये ही वर्तुळे तयार होतात. हातांना खाज येणे, जळजळ होणे, जखमा होणे अशी लक्षणे असतात.

    बुरशीजन्य संसर्ग हा यामध्ये स्वच्छ असणे गरजेचे आहे, या मध्ये प्रत्येक येणार गोष्टीची काळजी घेण गरजेचा आहे. खूप घट्ट कपडे घालणे टाळावे कारण ते तुमच्या त्वचेला हवेचा प्रवाह कमी करू शकतात आणि घाम वाढवू शकतात, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. सुती कपड्यांना प्राधान्य द्यावे. ओलसर हवामानात हे संक्रमण अधिक प्रमाणात होते. त्यासाठी आंघोळी नंतर तसेच हात-पाय धुतल्यानंतर ते व्यवस्थित सुती कपड्याने कोरडे करणे चांगले असते, ज्या व्यक्तीस संसर्ग आहे त्याचे कपडे वेगळे धुणे, तसेच कपडे घालण्यापूर्वी ते इस्त्री करणे चांगले असते.

    बुरशीजन्य संसर्गाच्या उपचारांमध्ये विशिष्ट अँटीफंगल क्रीम आणि डस्टिंग पावडर तसेच तोंडावाटे अँटीफंगल औषधे पेशंटला दिली जातात.नेहमी स्वच्छ कपडे घाला कारण बुरशीचे बीजाणू कपड्यांवर जास्त काळ चिकटू शकतात, विशेषत: जेव्हा ते धुतलेले नसतात. प्रभावित भागात खाजवणे टाळावे कारण यामुळे संसर्ग वाढू शकतो आणि पसरण्याची शक्यता देखील वाढते. अशा प्रकारे काळजी घेतल्यास संक्रमण टाळण्यास मदत होऊ शकते. बुरशीजन्य संसर्गाचा उपचार हा लवकरात लवकर करा अन्यथा खूप मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.