19 डिसेंबरला सोमवार आणि एकादशीचा शुभ योग; या दिवशी करा ‘हे’ व्रत सुख-समृध्दी कायम राहिल

    वर्षा संपण्यासाठी काही दिवस उरले आहेत, त्यामध्ये येत्या सोमवारी म्हणजे 19 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. यादिवशी सोमवार आणि एकादशीच्या संयोगा आहे, म्हणून या दिवशी महादेव आणि चंद्रदेवाची पूजा करणे शुभ राहील त्याच बरोबर भगवान श्रीविष्णू देखील शुभ राहिल.

    एकादशीला ‘हे’ व्रत

    • सोमवारी सकाळी लवकर उठून तळहाताकडे पाहून भगवान श्रीविष्णूचे ध्यान करावे. स्नानानंतर तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करताना ऊँ सूर्याय नमः मंत्राचा जप करावा.
    • सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर घरातील मंदिरात भगवान श्रीविष्णूसमोर व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प घ्यावा. श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर श्रीविष्णूसह महालक्ष्मीची पूजा करावी. पूजेत दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करावा. भगवान श्रीविष्णूच्या मूर्तीला रेशमी पिवळ्या रंगाचे आणि महालक्ष्मीच्या मूर्तीला रेशीम लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. इतर पूजन सामग्री अर्पण करून पूजा करावी.
    • तुळशीचे पाने टाकून मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धूप-दीप लावून आरती करावी. पूजा करताना ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा.
    • श्रीविष्णू-लक्ष्मीची पूजा केल्याने घर-कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहते. धन संबंधित कामामधील अडचणी दूर होतात. वैवाहिक जीवन सुखी राहते.

    यांच बरोबर भगवान शंकराच्या उपासना केल्याने अनेक लाभ होतील. जे शिवाची आराधना करतात त्यांचे लोभ, आसक्ती, अहंकार, अज्ञान, खोटे बोलणे, नशा यांसारखे दुष्कृत्य नाहीसे होतात. शिवाची उपासना केल्याने मन वाईट गोष्टींकडे भरकटत नाही. सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण करून बिल्वपत्र अर्पण करावे. दीप प्रज्वलित करून ऊँ नमः शिवाय मंत्राचा जप करावा.