‘या’ देशाची अर्थव्यवस्था महिलांच्या स्कर्टवरून ठरते; आर्थिक स्थिती खराब असेल तर अंडरवेअर खरेदी करण्याचे इरादे पुरुष भविष्यावर सोडतात

अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ जॉर्ज टेलर यांनी १९२६ साली हे सूत्र सांगितले आहे. देशातील मलींच्या स्कर्टकडे पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती ते दर्शवित असत. या समीकरणानुसार जसजशी देशातील बाजारपेठ कमजोर  होत जाते तसतसे छोटे स्कर्ट घालण्याची मुलींची हौस कमी होत जाते.

    खरे तर एखाद्या देशाची श्रीमंती अथवा गरिबी मोजण्यासाठी अर्थशास्त्रात काही सूत्रे आहेत तसेच काही गणिते केली जातात त्याचे विविध निकष ठरविलेले असतात. मात्र यापैकी एका निकषाविषयी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचे कारण म्हणजे त्याचा संबंध महिलांच्या स्कर्टशी किंवा पुरुषांच्या अंतर्वस्त्राशी आहे. ज्या देशातील महिला जितका लहान स्कर्ट घालतात तितका तो देश श्रीमंत असतो, अशी माहिती आहे. ज्या देशातील मुली लांब स्कर्ट घालतात त्या देशाची आर्थिक हालत कमजोर असल्याचे या अभ्यासानुसार मानले जाते.

    तुम्हाला वाटत असेल की, हे कोणते नवीन सूत्र आहे तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण, अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ जॉर्ज टेलर यांनी १९२६ साली हे सूत्र सांगितले आहे. देशातील मलींच्या स्कर्टकडे पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती ते दर्शवित असत. या समीकरणानुसार जसजशी देशातील बाजारपेठ कमजोर होत जाते तसतसे छोटे स्कर्ट घालण्याची मुलींची हौस कमी होत जाते.

    आर्थिक मंदीच्या काळात मुलींनी छोटे स्कर्ट घालणे कमी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुली आपले सामाजिक स्टेटस दाखविण्यासाठी छोटे कपडे घालतात, असे त्यांचे म्हणणे आहे. मुलींच्या स्कर्टवरून अंदाज लावला जातो तर पुरुषांचे अंतर्वस्त्र असणाऱ्या त्यांच्या अंडरवेअरवरूनही देशांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावता येतो. एखाद्या देशातील पुरुष किती अंडरवेअर खरेदी करतात यावरून त्या देशाची आर्थिक हालत कशी आहे, हे सांगितले जाऊ शकते.

    देशाची आर्थिक स्थिती खराब असेल तर अंडरवेअर खरेदी करण्याचे इरादे पुरुष भविष्यावर सोडतात. जेव्हा पैसे असतात तेव्हा अंडरवेअर खरेदी करण्याचे प्रमाण जास्त असते. २००८ च्या आर्थिक मंदीनंतर २०११ साली जेव्हा सुबत्ता आली तेव्हा अमेरिकेत पुरुषांची अंडरवेअर खरेदी ७ टक्‍क्‍यांनी वाढली होती.

    The economy of this country depends on womens skirts Men leave their intentions to buy underwear in the future if the financial situation is bad