
तंबाखू,दारू आणि मीठामुळे देशभरात मृत्यू पावणा-यांची संख्या वाढली आहे. येत्या काही वर्षात ही संख्या 100 कोटींपर्यंत पोहचेल. मात्र, सरकारने तंबाखू नियमांमध्ये काही कडक धोरणं अवलंबणे गरजेचे आहे. तंबाखू सेवन,धुम्रपानावर सार्वजनिक ठिकाणी बंदी घातली तर, त्याचे सेवन कमी होईल.
एकेकाळी तंबाखू सेवन, धुम्रपान करणे श्रीमंत लोकांचा शौक असायचा. मात्र, आता हे फॅड अगदी सर्वसामान्य मध्यम गटांमध्ये प्रचलित झाले आहे. या 21 व्या शतकात तंबाखू सेवनामुळे 100 दशलक्ष लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तंबाखू, अल्कोहोल आणि मीठ यांच्याशी संबंधित आजार आतापर्यंत फक्त श्रीमंत देशांमध्येच मोठी समस्या आहे. (tobacco)(alcohol)
जसजसे लोक अधिक जवळ येऊ लागले तसे, या व्यसनांनी आपली पाळंमुळं रोवायला सुरूवात केली. इतकचं नाही तर, या व्यसनांशी निगडीत अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला. हे आजार आता जगभरात लोकांचा बळी घेत आहेत. तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा खर्च कमी होत आहे. भारतात दरवर्षी 60 लाखांहून अधिक लोक दीर्घकालीन आजारांमुळे मृत्यू पावतात.
2030 पर्यंत जुनाट आजारांवर मात करण्याचं उद्दीष्ट आहे. धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्याचे दोन अतिशय प्रभावी मार्ग आहेत. पहिला सोपा मार्ग म्हणजे तंबाखूवर कर लावणे. आणि दुसरा म्हणजे तंबाखूविरोधी कायदे करणे. ज्यामध्ये तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालणे तसंच, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान हा दंडनीय गुन्हा असल्याचं घोषित करणे.
या धोरणामुळे धूम्रपान कमी होईल, ज्यामुळे 15 लाखांहून अधिक जीव वाचतील. अल्कोहोलमुळे कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दरवर्षी 3 दशलक्ष आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 1.6 दशलक्ष मृत्यू होतात. याशिवाय, जगभरातील आजार आणि अपघातांमुळे 7 लाख अतिरिक्त मृत्यू देखील कारणीभूत आहेत. दारूशी संबंधित कायदे कडक केले तर, त्याचे हानिकारक सेवन कमी होईल. विशेषतः देशी दारूवर बंदी घालणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे, सरकारने दारूबंदी,तंबाखू बंदीमसाठी पैसे गुंतवल्यास त्याचा फायदा देशातील तरूणांना होईल.