माथेरानची राणी परत धावणार; तब्बल तीन वर्षानंतर सेवा पुन्हा सुरु

    आजपासून नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरु, तब्बल तीन वर्षानंतर धावली मिनी ट्रेन गेले तीन वर्षांपासून माथेरान नेरळ मिनी ट्रेन सेवा बंद होती. पण आजपासून पुन्हा एकदा नेरळ माथेरान मिनी ट्रेन धावणार आहे. तरी माथेरान पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिध्द हिलस्टेशन पैकी एक आहे. पावसाळा-हिवाळा  या ऋतुत पर्यटक माथेरानला मोठ गर्दी करतात.

    तसेच उन्हाळा , दिवाळी  किंवा विकेंड्सला  देखील पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. पण माथेरान जवळील सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे नेरल. पुणे-मुंबईहून रेल्वेने येणारे प्रवासी नेरळ रेल्वे स्थानकावर उतरतात पण नेरळ पासून माथेरानला पोहोचायला पर्यटकांना खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागते आणि खासगी वाहनाने येण्यास पर्यटकांना मोठी किंमत मोजावी लागते तरी नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा अगदी किफायती दरात उपलब्ध आहे.

    आज सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी नेरळ माथेरान ट्रेन धावली. गेले अनेक दिवसांपासून याट्रेनची चाचणी सुरु होती पण नुकत्याचं यशस्वी पार पडलेल्या चाचणी नंतर आज नेरळ माथेरान ट्रेन एकदा पुन्हा धावली आहे. सध्या नेरळ ते माथेरान दोन आणि माथेरान ते नेरळ दोन अश्या चार फेऱ्या दिवसभरात चालणार आहेत. तरी माथेरान पर्यटकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण किफायती दराच्या प्रवासासोबतचं पर्यटकांना मिनी ट्रेनच्या विशेष प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.