अनशापोटी ‘गुळ’ खाल्ल्याने होतात ‘एवढे’ फायदे

    आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच भारतीय पाककलेत मागील अनेक वर्षांपासून गुळाचा वापर सुरु आहे. मात्र अलीकडे गुळाची जागा साखरेने घेतल्याने पाककृतीत अनेकदा साखरच घातली जाते. त्यामुळे शरीरात मधुमेहा सह अनेक रोग आजार प्रवेश करतात. तेव्हा आज तुम्हाला आम्ही अनशापोटी गूळ खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात हे थोडक्यात सांगत आहोत.

    रक्तदाब नियंत्रणात राहतो : रक्तदाब नियंत्रणातसाठी गूळ प्रभावी ठरतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळते. तसेच तुम्ही गुळाबरोबर आले सेवन केल्यास सांधेदुखीपासून लवकर मुक्ती मिळते.

    रक्त साफ होते : सकाळी अनशापोटी गूळ खालून कोमट पाणी प्यायल्यास रक्त स्वच्छ होते. त्यामुळे तुमच्या शरीरातील संपूर्ण रक्त सुद्धा होते.

    शरीराला मिळते ताकद : गुळाच्या नियमित सेवनाने शरीर ताकदवान होते. तसेच, दिवसभराचा थकवा दूर होण्यासही मोठी मदत होते. आणि तुमच्या शरीरात ऊर्जा पातळी कामय राहते आणि ती कमी होत नाही.

    रात्री गुळाचे सेवन करा : गुळाचे सेवन पोटात थंडावा पडतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत देखील होते. त्याचप्रमाणे गॅसचा त्रास देखील नाहीसा होतो.

    वजन कमी करते : तुम्ही जर लठ्ठपणाने त्रासलेले आहात तर, तुम्ही दुधासोबत गुळाचे सेवन चालू करा. कॅल्शिअमयुक्त दुधासोबत पोटॅशिअमयुक्त गुळ तुम्हांला सडपातळ आणि स्लिम बनवेल. दुधासोबत गुळाचा सर्वात हेल्थी फायदा घेण्यासाठी हे सेवन नियमित घेत जा.