सणासुदीच्या दिवसात खाण्यावर कंट्रोल राहत नाही; मग ‘या’ खास टिप्स वापरा

     

    आपले नावडते किंवा खूप काही आवडणारे पदार्थ जोपर्यंत आपल्या समोर नसतील, तोपर्यंत काही चिंता नसते. आपण आपल्या जिभेवर व्यवस्थित ताबा ठेवू शकतो. पण जेव्हा आवडते पदार्थ समोर येतात, तेव्हा मात्र ताबा सुटतो आणि आपण भरपेट जेवतो. एखाद्या पदार्थाची चव भारीच आवडून गेल्यावर किंवा सणासुदीच्या दिवसांत सगळं मिष्टान्न आणि सुग्रास भोजन समोर आल्यावर तर हमखास डाएटिंग  वगैरे सगळं विसरलं जातं.

     

    • जेवताना शांतपणे एका जागी बसा आणि त्यानंतरच जेवा.
    • आठवड्यातून एकदा तरी असं जेवण करा की जे तुम्ही स्वत: तुमच्या हाताने केलेलं असेल.
    • जेवताना सावकाश जेवा. अजिबात घाई करू नका.
    • जेवताना तुमचं सगळं लक्ष तुमच्या जेवणावर असावं. गप्पांच्या नादात किंवा टिव्ही, मोबाईल बघत बघत बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त जेवलं जातं