जांभळ्या रंगाचे ‘हे’ ६ सुपरफूड तुमची त्वचा सुधारू शकतात, जाणून घ्या त्यांचे फायदे

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारात केलेले बदल ही समस्या दूर करू शकतात. जांभळी फळे आणि भाज्या त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. जाणून घेऊयात ती जांभळी फळे आणि भाज्या ज्या त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात.

  त्वचा चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी त्वचेवर अनेक प्रकारची उत्पादने आणि घरगुती उपायांचा वापर केला जातो. परंतु त्वचेशी संबंधित समस्यांचा धोका कायम असतोच. अशा परिस्थितीत त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारात केलेले काही सोपे बदल ही समस्या दूर करू शकतात. एकंदर आरोग्यासोबतच जांभळ्या रंगाची फळे आणि भाज्या त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. जांभळ्या रंगाची फळे आणि भाज्या जाणून घ्या, जी त्वचा चमकदार बनवण्यास मदत करतात.

  जांभळी फळे आणि भाज्या आरोग्यासाठी का फायदेशीर आहेत?
  तज्ज्ञांच्या मते, जांभळ्या रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये प्रामुख्याने अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर,याने त्वचेला मुक्त रॅडिकल्सच्या प्रभावापासून संरक्षित केले जाऊ शकते, ज्यामुळे वृद्धत्व लांबण्यास मदत होते. त्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए चे प्रमाण वयाच्या आधी त्वचेवर दिसणाऱ्या बारीक रेषा आणि सुरकुत्याची समस्या दूर करते. जांभळ्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये अँथोसायनिन्स आढळतात, जे अँटिऑक्सिडंट असतात. त्यांचे सेवन सेल्युलर नुकसान टाळण्यासाठी आणि सेल्फ रिपेयरिंगसाठी मदत करते.

  तरुण आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी कोणती जांभळी फळे खावीत?

  १. बीटरूट त्वचेला तरुण बनवते
  बीटरूटमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म आढळतात. याच्या सेवनाने त्वचेला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून मुक्ती मिळते आणि जीवनसत्त्वे व खनिजांच्या गरजा पूर्ण होतात. यामध्ये असलेले अल्फा लिपोइक ॲसिड त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवून तरुण ठेवण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावरील मुरुम आणि पिगमेंटेशनची समस्याही दूर होऊ लागते. तुम्ही सलाड, ज्यूस आणि स्मूदीच्या रूपात तुमच्या आहारात याचा समावेश करू शकता.

  २. वांगी त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करते
  वांग्यामध्ये अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. एकूण आरोग्यासोबतच यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि मँगनीजचे प्रमाणही त्वचेला फायदेशीर ठरते. यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला कोरडेपणा, वृद्धत्व आणि काळे डागांपासून वाचवण्यास मदत करतात. वांग्यात आढळणारे नेसुनिन हे त्वचेच्या पेशींचे संरक्षण आणि दुरुस्ती करण्यास मदत करते.सोबतच, याच्या सेवनाने त्वचेचा निस्तेजपणा दूर होऊ लागतो.

  ३. जांभूळ
  जांभूळ या फळामध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण अधिक असते. त्वचेला चमकदार बनवण्यासाठी हे फायदेशीर तर आहेच पण मूड बूस्टर देखील आहे. याच्या नियमित सेवनाने शरीराला व्हिटॅमिन सी, फोलेट आणि मॅग्नेशियम मिळते. जांभळाच्या सेवनाने त्वचेचे मुक्त रॅडिकल्सच्या धोक्यापासून संरक्षण होते. यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांचा धोकादेखील कमी होतो.

  ४. काळी द्राक्षे
  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, काळ्या द्राक्षांमध्ये अँथोसायनिन्ससारखे अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येते. याचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील मुरुमे दूर होतात. याशिवाय त्वचेला सनबर्न, वॉटर रिटेन्शन आणि हायपरपिग्मेंटेशनपासून आराम मिळतो.

  ५. व्हिटॅमिन सी समृद्ध मनुका
  मनुक्यामध्ये अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळली जातात. याच्या सेवनाने त्वचेवर वाढणारे डाग आणि मुरुमांची समस्या दूर होऊ लागते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे त्वचा फ्रिकल्स आणि सुरकुत्यापासून दूर राहते. तसेच त्वचेची लवचिकता कायम राखण्यास हे मदत करते.