मेनोपॉजची लक्षणे कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी, जाणून घ्या सविस्तर

प्रत्येक महिन्याला महिलांना येणारी मासिक पाळी अचानक बंद झाल्यानंतर शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.

  महिलांना वयाच्या ४० शी नंतर शरीरासंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. प्रत्येक महिन्याला महिलांना येणारी मासिक पाळी अचानक बंद झाल्यानंतर शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. अचानकपणे मासिक पाळी बंद होणे याला ‘मोनोपॉज’ किंवा ‘रजोनिवृत्ती’ म्हणतात. १२ ते १५ या वयोगटामध्ये मुलींना मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. त्यावेळीपासून स्री गर्भधारणेसाठी योग्य असते. त्यानंतर वयाच्या 45 ते 50 व्या वर्षांपर्यंत मासिक पाळी सुरु राहते. मात्र वाढत्या वयानुसार ती अचानक येणे बंद होते. असे अनेक बदल स्त्रियांच्या शरीरामध्ये वाढत्या वयानुसार घडत असतात. मेनोपॉजच्या वेळी महिलांमध्ये निद्रानाश, थकवा, मूड बदलणे, वजन वाढणे आणि योनीमार्गात कोरडेपणा इत्यादी अनेक समस्या जाणवतात. याचा रोजच्या जीवनावर प्रभाव पडतो. हार्मोन्समधील बदलांमुळे या समस्या जाणवू लागतात. मेनोपॉजची लक्षणे कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.

  संतुलित आहार घेणे:

  मेनोपॉज दरम्यान थकवा आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागतात. त्यामुळे आहारात योग्य त्या पदार्थांचे सेवन करणे फार गरजेचे आहे. रोजच्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, दुबळे मांस, संपूर्ण धान्य इत्यादींचा समावेश करणे गरजेचे आहे. यामधून शरीराला सर्वाधिक पोषण मिळते. या दिवसांमध्ये अशाच पदार्थांचे सेवन करावे ज्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळेल.

  हायड्रेटेड राहणे:

  निरोगी शरीरासाठी हायड्रेटेड राहणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे दररोज कमीत कमी ६ ते ७ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच आहारामध्ये लिंबू पाणी, सरबत , ताक, दही, नारळ पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

  नियमित व्यायाम करणे:

  नियमित व्यायाम केल्याने शरीर सुधृढ राहते. व्यायाम केल्याने वजन नियंत्रित राहून मूड देखील सुधारतो. मेनोपॉजच्या दिवसांमध्ये शरीराची जास्त चीडचीड होते. त्यामुळे व्यायाम किंवा मेडिटेशन करणे गरजेचे आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ आणि लवचिकता वाढवणारे व्यायाम केल्याने शरीराला फायदा होतो.

  धूम्रपान करू नये:

  धूम्रपान केल्याने मेनोपॉजची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. त्यामुळे धूम्रपान करू नका. धूम्रपान न केल्याने मेनोपॉजसंबंधित इतर समस्या जसे की ऑस्टियोपोरोसिस आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. अल्कोहोल पिल्याने ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दारू पिऊ नये.

  हार्मोन थेरपी:

  तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन थेरपी करू शकता. ही थेरपी तुम्हाला मेनोपॉजच्या लक्षणांपासून दूर ठेवेल. हार्मोन थेरपी प्रत्येकासाठी योग्य आहे असे नाही याचे तोटे देखील आहेत. त्यामुळे याबाबतची सर्व माहिती डॉक्टरांकडून घ्यावी.