नाते घट्ट करण्यासाठी ‘या’ खास टिप्स तुमच्यासाठी…

  तुम्ही हे ऐकलेच असेल की, एक पर्टीक्युलर काळ एकत्र राहून घालवल्यानंतर नवरा बायकोच्या चेहऱ्यांमध्ये बरेच साम्य दिसू लागते. पण असे तेव्हाच होते, जेव्हा नवराबायको एकमेकांवर प्रेम (love) करतात आणि आपले संपूर्ण आयुष्य एकमेकांचा सन्मान करत जगतात. कुटुंबाचा पाया हा मजबूत आणि भक्कम असेल तरच संपूर्ण कुटुंब सगळ्या परिस्थितीत ठामपणे उभे राहते. ज्या पतीपत्नीच्या नात्यातील अधिकारांची भावना मैत्रीमध्ये  (friend)बदलत जाते. असे घर खूप आनंदी आणि सुखी राहते. तुम्हालाही असेच निखळ मैत्रीचे नाते हवे असेल तर, या गोष्टी (story) जर तुम्ही पाळल्या तर तुम्हीही तुमच्या सुंदर नात्याला मैत्रीने जपू शकता.

  नवराबायकोच्या नात्यामध्ये (Relationship)आपसातील प्रेमभाव, एकमेकांच्या इच्छेचा आदर करणे आणि एकमेकांवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे. एकत्र राहिल्याने नवरा बायकोच्या नात्यांमधील बॉंडिंग हे दिवसेंदिवस जास्त स्ट्रॉंग होत जाते. अशी जोडपी मित्रमैत्रिणीप्रमाणे राहतात. त्यासाठी नवराबायकोचे एकमेकांवर प्रेम असण्यासोबतच एकमेकांविषयी दोघांच्याही मनात आदर असणे गरजेचे आहे.

  पतीपत्नीच्या नात्यामध्ये मैत्री टिकून राहण्यासाठी सर्वात आधी मी पणा काढून टाकावा. माझे, मला, माझ्यासाठी, मी अशा शब्दांना तुमच्या आयुष्यात कधीच जागा देऊ नका. संसार करणे ही दोघांचीही समान जबाबदारी असते. म्हणून आपला संसार (life) टिकवण्यासाठी आणि सुरळीत चालण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

  जसे तुमच्या आयुष्यात (life) मी पणा नसला पाहिजे तसाच तुमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे तुमच्या दोघांच्याही मनात संशयाला जागा असू नये. तसेच नाते टिकून राहण्यासाठी तुम्हाला आपल्या पार्टनरला थोडी स्पेसही द्यावी लागेल. पतीपत्नीच्या नात्यामध्ये मैत्री ही किती महत्वाची असते. ही मैत्री टिकून राहण्यासाठी तुमच्यातल्या मी पणा सर्वात आधी काढून टाकायला हवा. संसार करणे ही दोघांची जवाबदारी असते म्हणून दोघांनीही संसार टिकवण्यासाठी आणि सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

  सुखी संसाराचे गुपित आहे, एकमेकांवर तुमचा गाढ विश्वास  (trust)  असणे गरजेचे आहे. तुमच्यापैकी जर कोणी चुकत असेल तर त्यांना आपली चूक सुधारण्यासाठी एक संधी मिळालीच पाहिजे. कोणीही परफेक्ट नसते हे दोघांनीही लक्षात ठेवून तसे वागले पाहिजे. तसेच एकमेकांपासून गोष्टी लपवू नका.

  तुमच्यात कधी वाद झालेच तर एकमेकांना दूषणे न देता शांतपणे यावर चर्चा करा. एकमेकांना सोडून जाण्याची धमकी न देता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या पार्टनरने केलेल्या चांगल्या कामांसाठी त्यांचे कौतुक करा. तुमच्यासाठी काही चांगले केले तर त्यांना धन्यवाद द्या. तुमचे एकमेकांना सांभाळून घेणे हेच तुमच्या संसाराला यशस्वी करू शकते.