माणसाने स्पर्श करताच या पक्ष्याचा होतो मृत्यू; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

ही कथा एकट्या याच पक्ष्याची नाही. वाघाने डरकाळी फोडली तरी भीतीने गलितगात्र झालेली माकडे झाडावरून खाली गळून पडू शकतात! ससा हा प्राणी सुद्धा खूपच भित्रा असतो. बहुतांश वेळा तुम्ही हातात ससा पकडला तरी तो मरत नाही.

    मनुष्य विषारी नसतो. परंतु, तरीसुद्धा टिटोनी पक्षी मनुष्याने हात लावताच मरून पडतो! यामागे भीती हे प्रमुख कारण आहे. तुम्ही टिटोनीची अंडी घरी उबवल्यावर त्यातून बाहेर पडणारे पक्षी तुमच्या स्पर्शाने मरू शकत नाही. परंतु, वातावरणात मुक्तसंचार करणार्‍या पक्ष्यांना तुमची सवय नसते. काही पक्षी खूपच भित्रे व संवेदनशील असतात. यातील टिटोनी हा एक प्रमुख पक्षी होय. अशा परिस्थितीत तुम्ही त्याला स्पर्श करताच त्याच्या हृदयाची क्रिया बंद पडते किंवा  संपूर्ण हृदयच फाटून जाते. आणि क्षणातच तो पक्षी मरून पडतो.

    ही कथा एकट्या याच पक्ष्याची नाही. वाघाने डरकाळी फोडली तरी भीतीने गलितगात्र झालेली माकडे झाडावरून खाली गळून पडू शकतात! ससा हा प्राणी सुद्धा खूपच भित्रा असतो. बहुतांश वेळा तुम्ही हातात ससा पकडला तरी तो मरत नाही. परंतु, बरेचदा गर्भवती मादी तुमच्या हाती लागली तर भीतीने तिचे हृदय फाटू शकते. हे मी स्वत: पाहिलेले आहे! टिटोनी खूप लाजाळू व हृदयाने कमजोर असा पक्षी आहे. त्यामुळे बहुतांश वेळा मनुष्याने स्पर्श केल्यावर तो मरून पडतो. कारण, तुमच्या स्पर्शाने निर्माण झालेली भीती त्याच्या अथांगापार होऊन जाते.