हिवाळ्यात आजारांशी लढण्याची ताकद देते ‘हे’ फळ; वजन घटेल, दिवसभर एनर्जेटिक राहाल

    ‘रताळे हे फार पूर्वीपासून भारतीयांचे मुख्य अन्न आहे. काही दशकांपूर्वीपर्यंत लोक ते रात्रीच्या जेवणासाठी घ्यायचे. पण हरितक्रांतीनंतर लोक तांदूळ, गहू यासारख्या धान्यांकडे वळले. कंदमूळ आणि भरड धान्य हे अशिक्षित आणि मजुरांचे अन्न मानले जात असे. मात्र अलीकडच्या संशोधनानंतर पुन्हा एकदा नवी पिढी या गोष्टींकडे वळू लागली आहे. खरं तर, रताळे, लोह, फोलेट, तांबे, कार्बोहायड्रेट्स, झिंक, मॅग्नेशियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वांनी समृद्ध, थंडीत खाण्यासाठीचे योग्य कंद आहे. उष्ण असलेले रताळे प्रभावीपणे रोगांशी लढण्याची शक्ती देते. तसेच त्याची चवही अप्रतिम असते.

     

    बटाट्यापेक्षा रताळे हेल्दी

    बटाट्याच्या तुलनेत रताळ्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी पुरेसे आहे. जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. देशात बहूतेक लोक रताले उकडून किंवा भाजून खातात.  देशात बहूतेक लोक रताले उकडून किंवा भाजून खातात. पण पाश्चात्य देशांत हे सलाड म्हणूनही खाल्ले जाते.

    रताळे हा असा कंद आहे जो पचायला थोडा वेळ लागतो. अशा स्थितीत जर तुम्ही सकाळी नाश्त्यात हे सेवन केले तर दिवसभर भूक लागणार नाही आणि तुमच्या डाएटिंगमध्येही अडथळा येणार नाही. यासोबतच हे भरपूर एनर्जी देखील देते, ज्यामुळे तुम्ही इतर काहीही खाल्ले नाही तरीही दिवसभर तुम्हाला उत्साही वाटेल.

    येथे हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे की झोपण्यापूर्वी रताळे खाऊ नका. हे खाल्ल्यानंतर तुम्ही सरळ झोपायला गेलात तर तुमचे वजन वाढू शकते.

    • रताळे कसे आणि किती खावे

    डॉक्टरांच्या मते, सामान्य पचनसंस्था असलेले लोक थंडीच्या दिवसात 100 ग्रॅम पर्यंत रताळे खाऊ शकतात. ते उकळवून किंवा आगीवर भाजून खाणे चांगले मानले जाते. अनेक ठिकाणी लोक ते कच्चेही खातात. पण ते जमिनीखाली वाढते. त्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असू शकतात. अशा परिस्थितीत ते न शिजवता खाणे योग्य नाही. रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम ऑक्सलेट आढळते, ज्यामुळे कधीकधी किडनी स्टोन होतो. अशा परिस्थितीत जर एखाद्याला किडनी स्टोनची समस्या असेल तर त्याने रताळे खाणे टाळावे.