आरोग्यासाठी हानिकारक ठरतंय ‘हे’ तेल, तज्ज्ञांनी दिला सावधगीरीचा इशारा

तज्ज्ञांच्या मते, रिफाइंड तेलामध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असल्याने हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे वजन झपाट्याने वाढते आणि मधुमेहासारख्या अनेक समस्या उद्भवतात.

  अलीकडच्या काळात रिफाइंड तेल वापरण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. त्यामुळेच बाजारात त्याची मागणीही वाढू लागली आहे. रिफाइंड तेलाच्या अनेक जाहीरातीही आपण पहिल्या असतील. रासायनिक फिल्टरिंग करून नैसर्गिक तेलापासून रिफाइंड ऑइल तयार केले जाते. हे तेल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. संशोधनात असे आढळून आले आहे की, शुद्ध तेलाचा नियमित वापर केल्यास अनेक आजारांना तोंड द्यावे लागेल. हे तेल आरोग्यासाठी घातक ठरेल. तसेच आरोग्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर ठरते. याशिवाय तुम्ही शेंगदाणे, तीळ, सूर्यफूल आणि खोबरेल तेल यांचाही आहारात समावेश करू शकता.

  नियामतपूरच्या गृहविज्ञान तज्ज्ञ डॉ.विद्या गुप्ता यांनी याबद्दलची माहिती देताना सांगितले की, अनेक वनस्पती तेलांना रासायनिक पद्धतीने शुद्ध करून त्यापासून रिफाइंड तेल तयार केले जाते. रिफाइंड तेलाच्या वापरामुळे आपल्याला अनेक आजरांना सामोरे जावे लागेल. अनेक लोक यामुळे आजारी देखील पडत आहेत. यामुळे लोक लठ्ठपणा, मधुमेह, एथेरोस्क्लेरोसिस, गॅस्ट्रो आतड्यांसंबंधी समस्या यांसारख्या गंभीर समस्यांनी ग्रस्त आहेत तसेच त्यांच्या प्रजनन क्षमता आणि प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. अशा तेलांचा वापर करणे टाळावे अथवा अजिबात करू नये.

  रिफाइंड तेल अनेक आजारांना जन्म देते
  डॉ विद्या गुप्ता यांनी स्पष्ट केले की, रिफाइंड तेलामध्ये ट्रान्स फॅट अधिक प्रमाणात असते ज्यामुळे हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका निर्माण होतो. यामुळे वजन झपाट्याने वाढते आणि मधुमेहासारख्या अनेक समस्याही उद्भवतात. वास्तविक, शुद्ध तेल बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान निकेल सोडले जाते, ज्याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. यामुळे यकृत, त्वचा आणि श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

  हे तेल वापरा
  कोणते तेल वापरावे याविषयीची माहिती देताना डॉ. विद्या गुप्ता यांनी सांगितले की, मोहरीच्या तेलासोबतच इतर नैसर्गिक तेल देखील वापरता येतात. ज्यामध्ये शेंगदाणा तेल, तिळाचे तेल, सूर्यफूल तेल आणि खोबरेल तेल यांचा समावेश आहे. याचबरोबर तुम्ही मोहरीच्या तेलाचाही यात समावेश करू शकता. मोहरीच्या तेलात अँटीबैक्टीरियल गुणधर्म आढळतात जे शरीरात हानिकारक जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करतात. हे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. ही नैसर्गिक तेलं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि यांचा आपल्या आरोग्यावर परिणामही होत नाही. कोणतेही रासायनिक तेल वापरण्या ऐवजी तुम्ही नैसर्गिक तेलांचा वापर करू शकता.