यंदाच्या आंतरराष्ट्रीय साइन लँग्वेज डे निमित्त KFC काहीच बोलणार नाही…शब्दश: काहीच नाही!

साइन लँग्वेजला (Sign Languages) संवादाचे माध्यम (Medium of communication) बनवण्याबद्दल जागरुकता आणि स्वीकृती निर्माण करण्यासाठी 'शब्दांपेक्षा कृतीवर भर' हा मार्ग त्यांनी निवडला आहे. आपल्या केएफसी (KFC) क्षमता प्रोग्रामच्या माध्यमातून लिंग आणि क्षमतेसंदर्भात समानतेला बळकटी देण्याची बांधिलकी त्यांनी जपली आहे. या दिनानिमित्त १३० हून अधिक दिव्यांग कर्मचारी असलेल्या ३३ रेस्तराँमध्ये एकच भाषा बोलली गेली.

  • 'शब्दांपेक्षा कृतीवर भर' यावर विश्वास ठेवणाऱ्या या ब्रँडतर्फे ग्राहक आणि टीम सदस्यांना साइन लँग्वेजमध्ये संवाद साधण्यास प्रोत्साहन दिले जात आहे

नवी दिल्ली : केएफसीप्रेमींना (KFC Lovers) नि:शब्द करेल असं एक सरप्राइज (Surprise) नुकतंच मिळालं. देशभरातील स्पेशल केएफसी रेस्तराँमध्ये (Special KFC Restaurant) आंतरराष्ट्रीय साइन लँग्वेज डे साजरा केला गेला (Celebration of International Day of Sign Languages 2021).

साइन लँग्वेजला (Sign Languages) संवादाचे माध्यम (Medium of communication) बनवण्याबद्दल जागरुकता आणि स्वीकृती निर्माण करण्यासाठी ‘शब्दांपेक्षा कृतीवर भर’ हा मार्ग त्यांनी निवडला आहे. आपल्या केएफसी (KFC) क्षमता प्रोग्रामच्या माध्यमातून लिंग आणि क्षमतेसंदर्भात समानतेला बळकटी देण्याची बांधिलकी त्यांनी जपली आहे. या दिनानिमित्त १३० हून अधिक दिव्यांग कर्मचारी असलेल्या ३३ रेस्तराँमध्ये एकच भाषा बोलली गेली.

आमच्याशी चिन्हांमधून बोला हे ग्राहकांना सांगताना केएफसी इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर मोक्ष चोप्रा म्हणाले, “प्रत्येकालाच त्याच्या ठरलेल्या टेबलावर एक सीट असतेच म्हणजेच प्रत्येकाचाच एक ठरलेला वाटा असतो, यावर आमच्या प्रमुखांचा विश्वास होता आणि त्यांची तत्वे, मूल्ये आजही आम्हाला प्रेरणा देतात. सर्वसमावेशकतेबद्दल संवादाला सुरुवात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साइन लँग्वेज डेहून अधिक चांगला मार्ग काय असेल? केएफसी क्षमता या उपक्रमाच्या संदर्भात ही कृती म्हणजे आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. कारण इथे अगदी शब्दश: अर्थानेही शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची ठरते. कर्मचारी आणि ग्राहकांना साइन लँग्वेजमध्ये बोलण्यास प्रोत्साहन देणं हा आमचा उपक्रम म्हणजे मूकबधिरांसोबत साधल्या जाणाऱ्या संवादातील अडथळे दूर करण्याचा एक प्रयत्न आहे. खरं म्हणजे, एकमेकांना समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी शब्दांची गरज असतेच असं नाही.”

सर्व स्पेशल केएफसी रेस्तराँमध्ये त्यादिवशी प्रचंड उत्साह जाणवत होता. ‘गिव्ह अस अ साइन’ असा सुयोग्य आणि लक्षवेधी संदेश रेस्तराँच्या प्रवेशद्वारावर ग्राहकांचे स्वागत करत होता. त्याचप्रमाणे ‘कुछ ना कहो’ यासारखी मजेशीर पण संदर्भ असलेली वाक्ये ग्राहकांना या आनंदात साइन लँग्वेजसह सहभागी होण्यासाठी प्रेरित करत होती. दिव्यांग टीम मेंबर्सचा उत्साह, ग्राहकांना साइन लँग्वेजचे प्राथमिक नियम शिकवण्याचे त्यांचे प्रयत्न असा हृदयस्पर्शी देखावा सर्व रेस्तराँमध्ये होता. ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी टीम मेंबर्सनी ‘लेट्स यूझ लेस वर्ड्स ॲण्ड मोअर साइन्स टुडे’ असे बॅजेसही लावले होते. ग्राहकही तितकेच उत्साही आणि सहभागास उत्सुक होते. ज्यांनी साइन लँग्वेजचा वापर करून आपल्या ऑर्डर्स यशस्वीरित्या दिल्या त्यांना सरप्राइज म्हणून ऑनररी बँड देण्यात आले. ते खरे ‘ॲक्शन हिरो’ आहेत याचे स्मरण दिवसभर त्यांना होत राहिले. यातला आणखी एक छान भाग म्हणजे पोस्टर म्हणून अनावरण झालेले बुकलेट. रेस्तराँमधील प्रत्येक टेबलवर ठेवलेल्या या बुकलेटमध्ये मित्रमंडळी आणि कुटुंबांसोबत केएफसी चिकनची आपली आवडती बकेट रिचवताना संवाद साधण्यासाठी साइन लँग्वेजची प्राथमिक माहिती यात देण्यात आली होती. ‘तुम्ही कसे आहात?’ ‘आज काय प्लॅन आहे?’ ‘LOL’ अशा वाक्यांसाठी यात साइन्स दिलेल्या होत्या. त्यामुळे क्रिस्पी पदार्थांसोबत संवादही मस्त चटपटीत होत होता. इतकंच नाही, हा दिवस अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी या ब्रँडतर्फे त्यांच्या सोशल मीडिया चॅनल्सवर ‘क्रंच कोर्स इन साइन लँग्वेज’ असं सुयोग्य नाव असलेला एक छोटा टयुटोरिअल व्हिडीओही पोस्ट करण्यात आला होता. साइन लँग्वेजचा वापर करून ऑर्डर कशी द्यायची आणि अशा इतर गोष्टींचा यात समावेश होता. केएफसी क्षमता – सर्वसमावेशकता आणि परस्परांचा आदर राखणाऱ्या संस्कृतीला जपत बहुविध मनुष्यबळ उभारण्याच्या या उपक्रमातील एक महत्त्वाचा भाग म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला. केएफसी क्षमता या उपक्रमातून लिंग आणि क्षमता असमतोलातील दरी भरून काढणे आणि २०२४ पर्यंत रेस्तराँमधील कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या दुपटीने वाढवणे हा उद्देश राखण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, २०२४ पर्यंत स्पेशल केएफसीची संख्या दुप्पट करणे हा उद्देशही यात आहे. तोवर, Keep Calm and Sign on…!