जुना माठ साफ करायचायं मग फोलो करा ‘या’ टिप्स, पाणी राहणार स्वच्छ आणि थंडगार!

प्रत्येक वेळी तुम्हाला जुन्या माठावर साचलेल्या धुळीमुळे माठ बदलावा लागतो, मात्र काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुमचा जुना माठ अगदी नवीन बनवू शकता.

  उन्हाळा सुरू होताच थंड पाण्याची तल्लफही वाढू लागते. ही तल्लफ पूर्ण करण्यासाठी काही लोक फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतात. पण रेफ्रिजरेटरचं थंड पाणी पिणं आरोग्याला घातकही आहे. त्यामुळे काही जण माठातलं पिणं पसंत करतात. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल ज्यांना माठातलं पाणी प्यायला आवडतं.
  पण माठावर साचलेल्या धूळ आणि शेवाळामुळे प्रत्येक वेळी ते बदलावं लागण्याचं कंटाळा येत असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स (How To Clean Clay Pot) सांगणाार आहोत. या काही सोप्या टिप्सचा वापर करून  तुम्ही तुमचा माठ अगदी नवा बनवू शकता.

  माठ स्वच्छ करण्यासाठी टिप्स

  माठ पाण्याने भरण्यापूर्वी ते पाण्यात पूर्णपणे भिजवावे. असे केल्याने माठात पाणी साठविल्यास पाणी चांगलं थंड होईल.
  जुना माठ स्वच्छ करण्यासाठी तो फक्त साध्या पाण्याने धुवू नका. माठ स्वच्छ करण्यासाठी पाणी, वॅाशिंग पावडर आणि लिंबाची मदत घ्या. अर्धी बादली गरम पाण्यात एक चमचा वॅाशिंग पावडर लिंबाचा रस घालून मिक्स करा  आणि ते माठात घाला. आता साचलेले शेवाळ आणि माती काढून टाकण्यासाठी स्क्रबरच्या साहाय्याने घासून  माठ स्वच्छ करा. असं केल्यानं माठातली माती तर स्वच्छ होईलच पण वासही निघून जाईल. यानंतर, माठ वापरण्यापूर्वी एक किंवा दोनदा साध्या पाण्याने धुवा.
  एका भांड्यात १ चमचा बेकिंग सोडा, १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर आणि थोडे मीठ घालून द्रावण तयार करा. आता हे द्रावण माठमध्ये टाका आणि स्क्रबर किंवा ब्रशच्या मदतीने घासून घ्या. असं केल्याने काही मिनिटांत भांडे स्वच्छ होईल  आणि वासही निघून जाईल.
  पाण्यात सालासह लिंबाचा रस घालून उकळवा. हे पाणी भांड्यात टाका आणि भांडे स्वच्छ करा.
  माठातील पाणी रोज बदलावे. तेच पाणी दोन-तीन दिवस भरून ठेवल्यास त्यामध्ये शेवाळ जमा होते. तसेच माठ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाची सालही माठावर घासू शकता. त्यानंतर माठ पाण्याने धुवा.