खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळात; आता बनवा ‘उपवासाची पुरी-भाजी’ झटपट

   साहित्य 

  • हिरव्या मिरच्या – 3 ते 4
  • बटाटे – 4
  • राजगिऱ्याचे पाठी – 2 वाट्या
  • साजूक तूप – दोन वाट्या
  • जिरे- 1 छोटा चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – चिमूटभर
  • आले – 1 चमचा (किसलेले)
  • कोथिंबीर – अर्धी वाटी
  • कढीपत्ता – 5 ते 6 पाने
  • खोवलेला नारळ – अर्धी वाटी

  कृती

  • उपवासाची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे उकडून घ्या.
  • उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्या.
  • तूपात जिरे टाकावेत.
  • जिरे तडतडल्यानंतर त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे टाकावे.
  • नंतर त्यात बटाट्याच्या फोडी, मीठ आणि साखर घालून भाजी वर-खाली करत मिक्स करावी.
  • त्यानंतर एक वाफ काढून घ्यावी.

   पुऱ्या

  • पुऱ्या बनवण्यासाठी एका परातीत राजगिऱ्याचे पीठ घ्यावे.
  • दहा मिनिटांनी पीठ चांगले मळून घ्यावे.
  • पीठ मळल्यानंतर पुऱ्या लाटून ते तुपात टळून काढा.