today daily horoscope 29 march 2023 leo will become commercially successful and her name and fame will spread read rashibhavishya in marathi nrvb

मेष (Aries):

आपल्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात पुढे राहाल. आजच्या दिवसाची सुरुवात चांगली बातमीने होणार आहे. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक टाळावी. आज काही नवीन खरेदी कराल. आज धन आणि लाभाचे योगही येत आहेत.

वृषभ (Taurus):

नशीबाची आज चांगली साथ मिळेल. तुम्ही तुमचा मित्र आणि ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन बिझनेस प्लॅनवर काम करण्यासाठी तुमच्यासाठी ही चांगली वेळ आहे. हुशारीने काम करा, अडचणी सहज होतील. तरुणांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. कामासाठी आजचा दिवस उत्तम राहील. तुमच्या आवडत्या जेवणाचा मित्रांसोबत आनंद घ्या.

मिथुन (Gemini):

आज वर्तन अतिशय सौम्य असणार आहे, वर्तनातील बदल इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. आज तुम्ही तुमच्या कामात मेहनत कराल आणि एखाद्याच्या मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळतील. मित्रांना दिलेले वचन पूर्ण करणे सोपे जाईल.

कर्क (Cancer):

आज चांगल्या लोकांशी संपर्क निर्माण होतील, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. नवीन मित्र तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यात मदत करतील. आज नशिबाला चांगली साथ मिळेल. अधिकारी काम पाहून कौतुक करतील. सासरच्यांकडून चांगली बातमी मिळेल.

सिंह (Leo):

दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. इतरांसोबत मिळून केलेल्या कामातही चांगला फायदा होईल. तुमचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मक ठेवा. आज व्यापारी वर्गाला विशेषत: चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे धन आणि लाभाचे योग येतील.

कन्या (Virgo):

आजचा दिवस कामाच्या दृष्टीने चांगला आहे. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये नक्कीच यश मिळेल. आज आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अचानक खर्चही वाढणार आहेत. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

तूळ (Libra) :

आज शत्रूंना आपल्यावर वर्चस्व गाजवू देवू नका. आज तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. आज नशीब तुमच्या सोबत असणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला जाल. सध्याच्या परिस्थितीमुळे व्यावसायिक उपक्रम कमकुवत राहतील. आरोग्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे.

वृश्चिक (Scorpio) :

नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगला दिवस जाईल. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या मनातील गुरु आणि वडीलधाऱ्यांबद्दल आदराची भावना वाढेल. तुमच्या बोलण्यात गोडवा असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल.

धनु (Sagittarius):

आपली बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून आपली कामे सहज पूर्ण करतील. बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे मित्र आणि नातेवाईकांशी संबंध अधिक घट्ट होतील. आज तुमच्या घरातील शुभ कार्य पूर्ण होतील. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल.

मकर (Capricorn):

आजचा दिवस कामात चांगले यश मिळवून देणारा आहे. तुमची मेहनत आणि नशिबाची साथ तुमच्यासाठी चांगली असणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात स्वतःहून लाभ मिळेल. प्रॉपर्टी डीलबाबत निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. खर्च सावध करा. वाहन चालवतानाही काळजी घ्या. तुम्ही होळीचा आनंद लुटणार आहात. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.

कुंभ (Aquarius):

आज कोणाशीही विनाकारण भांडण होऊ शकते, रागावर नियंत्रण ठेवा आणि सणाचा आनंद घ्या. आरोग्याच्या दृष्टीने आज तुमचे आरोग्य चांगले राहील. शरीरात चपळता असेल, नोकरी असो किंवा व्यवसाय, आज तुम्हाला चांगले यश मिळेल. कौटुंबिक सुख असेल. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. प्रगतीसाठी मेहनत कराल.

मीन (Pisces) :

आज चपळाईने आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत कोणाच्या तरी सहकार्याने काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल, मनाला आनंद होईल. भागीदारी व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. महिला आज घरातील कामात जास्त व्यस्त राहतील.