
मेष (Aries):
आज चांगली बातमी मिळेल. सन्माननीय व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. धनलाभाचे मार्ग निर्माण होतील. लहान-सहन प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवणे आवश्यक आहे. एकत्र काम करणाऱ्या सहकर्मींकडून आनंद मिळेल. मालमत्तेबाबत गर्व वाटेल. बऱ्याच काळापासून खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
वृषभ (Taurus):
घरात प्रेम व सामंजस्य दिसून येईल. एखाद्या शोध प्रकल्पाचे काम तुम्ही करू शकता. न्यायालयीन गोष्टींमधून सुटका होऊ शकते. व्यापार संबंधित लोकांनी प्रामाणिकपणाने काम केले पाहिजे. वास्तवाचे भान ठेऊन आर्थिक योजना राबवाव्यात. मित्रांसमोर मन मोकळे करू शकता. आज वेळेवर सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल. जोखमीची कामे सध्या टाळा.
मिथुन (Gemini) :
आज तुमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्या प्रतिष्ठेत वाढ करेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग व योजना शोधण्याची गरज आहे. कार्य विस्तार करण्यासाठी कर्जही घ्यावे लागू शकते. पैशांच्या बाबत यश मिळू शकते. मालमत्तेचा सौदा करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असेल. गरजेपेक्षा जास्त खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
कर्क (Cancer) :
आज स्वतःसाठी वेळ काढणे चांगले असेल. आपापसातील विश्वासाच्या आधारे कौटुंबिक नाती मजबूत होतील. व्यापार क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. वचन पूर्ण न करू शकल्याने मित्र नाराज होऊ शकतात. तुमची कमाई चांगली होईल. झटपट यश मिळवण्याच्या नादात चुकीची कामे करू नका.
सिंह (Leo):
आज झालेल्या चर्चेमुळे तुम्हाला आनंद होईल. जाणकार व वरिष्ठ लोकांबरोबर काम करण्याची संधी दवडू नका. यावेळी व्यापारी लोकांना बुद्धीने काम करावे लागेल. स्थायी संपत्तीची खरेदी-विक्री संभवते. वित्तीय गोष्टी तुमच्या बाजूने सुटू शकतात.
कन्या (Virgo):
आज फक्त दुसऱ्यांचे म्हणणे काय आहे ते ऐकून घ्या. अधिकाऱ्यांशी ओळख वाढेल. दुसऱ्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. अनावश्यक खर्चात कपात करा. कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने बदल होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होईल. एखाद्या मोठ्या कार्यक्रमात मित्रांचे सहकार्य मिळेल.
तूळ (Libra):
आज स्वभावातील उदारमतवादीपणा लोकांना प्रभावित करेल. ऑनलाईन नवीन ज्वेलरी खरेदी करण्याची संधी मिळेल. झटपट पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत पैसे गुंतवण्यापासून सावध रहा. अभ्यासात चांगले काम कराल. विमा तसेच गुंतवणुकीविषयी योजना करत असल्यास दिवस शुभदायी ठरेल. विवाहितांना संतान सुखाची प्राप्ती होईल.
वृश्चिक (Scorpio) :
आज दुसऱ्या लोकांबरोबर राजकारणाबाहेर राहण्याचा प्रयत्न करा. नवीन काहीतरी करण्याची उर्मी व उत्साह दिसून येईल. खाण्या-पिण्याच्या व्यापारी लोकांसाठी चांगला काळ आहे. तुमची मुले तुम्हाला व्यवसायात सहकार्य करतील. योग्य गुंतवणुकीसाठी तुम्ही काळजीत असाल. विद्यार्थ्यांना विशेष शिक्षकांचे सहाय्य मिळेल. एखाद्यावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे तणावपूर्ण होईल.
धनु (Sagittarius):
दिवसाची सुरुवात नव्या उमेदीने होईल. घरून काम करण्याऱ्या लोकांचे काम वेळेपूर्वी पूर्ण होईल. रियल इस्टेटशी संबंधित लोकं डिस्काऊंट मागू शकतात. जोडीदाराच्या नावाने केल्या जाणाऱ्या कामात लाभ होईल. व्यापारात कोणताही बदल करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाची बातमी मिळू शकते.
मकर (Capricorn):
दैनंदिन वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचा एखादा छंद किंवा कला जोपासण्याचा प्रयत्न करा. नवीन काम सुरु करण्याचा विचार करू शकता. व्यवसायाशी संबंधित मोठ्या गोष्टीचे निराकरण होऊ शकते. आर्थिक कामात ध्यान लावल्याने मन शांत होईल. दुकानाशी संबंधित काळजी कायम राहील.
कुंभ (Aquarius):
आज तुमचा दिवस चांगला जाईल. कार्यक्षेत्रात तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढवण्याचे मार्गदेखील दिसून येतील. आवश्यक देण्या-घेण्याबाबत सावधानता बाळगा. कविता किंवा कथा लेखन करू शकता. कुटुंबातील तुमचा सकारात्मक प्रतिसाद लोकांना प्रभावित करेल.
मीन (Pisces) :
आज लहान-सहान गोष्टींवर रागावण्यापासून स्वतःवर नियंत्रण ठेवा. एखाद्या खास गोष्टीबाबत तुमचा विचार बदलू शकतो. ऑनलाईन व्यापार करणाऱ्या लोकांना कार्यविस्तारासाठी नवीन योजना तयार करावी लागेल. महत्वाचा निर्णय घेताना जवळच्या लोकांचा सल्ला विचारात घ्या. अडकलेली योजना नव्याने सुरु करण्यासाठी चांगला वेळ आहे.