आज शीतला सप्तमी, शीतला मातेला दिला जातो शिळ्या अन्नाचा नैवेद्य, जाणून घ्या…

    हिंदू धर्मात शीतला सप्तमीला (Sheetala Saptami) खूप महत्त्व आहे. या दिवशी शीतला मातेची पूजा (Sheetala Mata Pooja) केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, केवळ शीतला सप्तमी किंवा शीतला अष्टमीलाच (Sheetala Ashtami) मातेला शिळ्या अन्नाचा नैवेद्य दिला जातो. या दिवशी सुहासिनी नियमानुसार शीतला मातेची पूजा करतात. उत्तर भारतात शीतला सप्तमी ‘बासोदा उत्सव’ म्हणून साजरी केली जाते.

    शीतला सप्तमीची पूजा
    शीतला सप्तमी (Sheetala Saptami )०४ ऑगस्ट २०२२, गुरुवारी आहे. शीतला सप्तमीचा  (Sheetala )पूजा  (puja) मुहूर्त सकाळी ०६ वाजून २१ मिनिटांपासून सायंकाळी ०६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत आहे. हिंदू धर्मात केवळ शीतला सप्तमी (Saptami) किंवा शीतला अष्टमीलाच (Asthami) शीतला मातेला ( Mata) शिळ्या अन्नाचा नैवेद्य दिला जातो. या दिवशी महिला नियमानुसार शीतला मातेची पूजा करतात. शीतला मातेच्या कृपेने धन आणि अन्नधान्याची वृद्धी होते आणि अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. या दिवशी घरी (home) ताजे अन्न (fresh food) तयार केले जात नाही.

    शीतला सप्तमीच्या आदल्या दिवशी घरोघरी (home) अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. यामध्ये शिरा, पुरी, दही वडा, भजी, रबरी आदी पदार्थांचा समावेश असतो. मात्र, शीतला मातेला दुसऱ्या दिवशी सकाळी शिळ्या अन्नाचा नैवेद्य (Stale food offering)अर्पण केला जातो. महिला आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी मातेला प्रार्थना करतात. शीतची पूजा झाल्यानंतर घरातील सर्व सदस्य शिळे अन्न ग्रहण करतात. शीतला सप्तमी ‘बासोदा उत्सव’ म्हणून साजरी केली जाते. मात्र, यानंतर घरात शिळे अन्न खाणे योग्य नाही, असे देखील सांगितलं जाते.