नवरात्रौत्सवातील महत्त्वाची महाअष्टमी आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

प्रभू रामाच्या (Ram) प्राप्तीसाठी सीतामातेने (Goddess of Sita) ही पूजा केली होती, अशी मान्यता आहे. पार्वतीनेही भगवान शंकरांसाठी कठोर तपस्या केली होती, त्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला दर्शन दिले.

  मुंबई : आज नवरात्रौत्सवा (Navratri festival) चा आठवा दिवस आहे. याला महाअष्टमी (Maha Ashtami) किंवा दुर्गाष्टमी नावाने ओळखले जाते. या दिवशी दुर्गामातेच्या आठव्या रुपात महागौरीची पूजा करण्यात येते.

  प्रभू रामाच्या (Ram) प्राप्तीसाठी सीतामातेने (Goddess of Sita) ही पूजा केली होती, अशी मान्यता आहे. पार्वतीनेही भगवान शंकरांसाठी कठोर तपस्या केली होती, त्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला दर्शन दिले.

  दुर्गाष्टमीचा मुहूर्त-

  अष्टमीचा प्रारंभ- १२ ऑक्टोबर रात्री ९ वा. ४९ मि.
  अष्टमी समाप्त- १३ ऑक्टोबर रात्री ८ वाजून ९ मिनिटांनी

  देवीचा पूजाविधी

  या दिवशी स्नान केल्यानंतर दुर्गामातेची षोडषोपचारे पूजा करण्यात येते. दुर्गा मातेची पूजा करताना पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करावे. देवीची मनोभावे पूजा करुन, तिला पांढरी किंवा पिवळी फुले वाहावीत, दिवा लावून तिची आरती करावी, नारळ अर्पण करावा. त्यानंतर मंत्राचा जप करावा. आज राज्यभरात घराघरात, शक्तिपीठांमध्ये आणि ठिकठिकाणी देवीच्या मंदिरांमंध्ये मोठी पूजा अर्चा करण्यात येते.

  आपल्या मनातील सर्व इच्छा या पूजेने पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. आपल्या जगण्यात समृद्धी येण्यासाठी आणि शत्रुंवर मात करण्यासाठी ही पूजा फलदायी मानण्यात येते.