आज ‘वर्ल्ड साडी डे’ भारतात राज्यागणिक साडी परिधान करण्याचे देखील वेगवेगळे अंदाज; साडी नेसण्याची पद्धतही बदल

    आज ‘वर्ल्ड साडी डे’ आहे त्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचा एक भाग म्हणून साडीकडे पाहिलं जातं. भारतात राज्यागणिक साडी परिधान करण्याचे देखील वेगवेगळे अंदाज आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने सहावारी आणि नऊवारी साडी पारंपारीक अंदाजात नेसली जाते. पण आता या साडीसोबतही फॅशन जगतामध्ये वेगवेगळे लूक ट्राय केले जात आहेत. थीम पार्टीमध्ये अनेकींची पसंत साडीला असते. मग पहा मॉडर्न अंदाजात ट्रेंडी लूक मध्ये साडी काही हटके अंदाजात कशी नेसली जाऊ शकते?

    साडी नेसणं आणि नेसवणं ही देखील एक कला आहे. आजकाल अनेकजणी महाराष्ट्रात सहावारी साड्या देखील खास ट्रिक्स आणि टीप्स वापरून नऊवारी अंदाजात नेसवली जाते. मग त्यामधूनच धोती स्टाईल साडी, नेक रॅप साडी हे अंदाजही लोकप्रिय होत आहेत.