तुळ आजचे राशीभविष्य : १५ जानेवारी २०२२ ; शांत रहा आणि काम करा व नवीन योजनांवर चर्चा करा

    तुळ (Libra) :

    कार्यक्षेत्रात एकत्र काम करणार्‍या सहकाऱ्यांच्या व्याव्हाराकडे विशेष लक्ष द्या. वाहनांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना याचा फायदा होईल. कुटुंबात कोणतेही शुभ कार्य आयोजित करण्याविषयी चर्चा होईल. शांत रहा आणि काम करा व नवीन योजनांवर चर्चा करा. जोडीदाराशी असलेले नाते दृढ होईल. विद्यार्थ्यांना अप्रिय बातम्या ऐकायला मिळतील. जीवनमान सुधारण्यासाठी कायमस्वरुपी वापरात असलेल्या वस्तूच खरेदी कराव्यात. संध्याकाळी एक विशिष्ट पाहुण्यांच्या भेटीचा योग आहे.