दिनविशेष, १२ जून; २००० साली मराठी विनोदी लेखक पद्म भूषण पु. ल. देशपांडे यांचे निधन झाले

  १२ जून घटना

  • २००१: कोनेरु हंपी – या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
  • १९९६: एच. डी. देवेगौडा – यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
  • १९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
  • १९७५: इंदिरा गांधी – अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
  • १९६४: नेल्सन मंडेला – यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
  • १९४२: ऍन फ्रॅंक – यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
  • १९०५: भारत सेवक समाजाची (Servants of India Society) – स्थापना.
  • १८९८: फिलिपाइन्स – देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
  • १८९६: जे.टी. हर्न – प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.

   

  १२ जून जन्म

  • १९८५: ब्लॅक रॉस – मोझीला फायरफॉक्स (mozila firefox) ब्राऊसरचे सहसंस्थापक
  • १९५७: जावेद मियाँदाद – पाकिस्तानी क्रिकेटपटू
  • १९५७: गीतांजली श्री – हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक – आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
  • १९३९: ओबेदुल्ला अलीम – भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक (निधन: १८ मे २००३)
  • १९२९: ऍना फ्रँक – जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी
  • १९२४: जॉर्ज बुश – अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष
  • १९१७: भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (निधन: २१ जून २०१२)
  • १८९४: पुरुषोत्तम बापट – बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक (निधन: ४ नोव्हेंबर १९९१)

   

  १२ जून निधन

  • २०२०: आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी – उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार (जन्म: ७ जुलै १९२६)
  • २०२०: पारसनाथ यादव – भारतीय राजकारणी (जन्म: १२ जानेवारी १९४९)
  • २०१५: नेकचंद सैनी – भारतीय मूर्तिकार – पद्मश्री (जन्म: १५ डिसेंबर १९२४)
  • २००३: ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेते (जन्म: ५ एप्रिल १९१६)
  • २०००: पु. ल. देशपांडे – मराठी विनोदी लेखक – पद्म भूषण (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
  • १९८३: नॉर्मा शिअरर – कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री (जन्म: १० ऑगस्ट १९०२)
  • १९८१: पी. बी. गजेंद्रगडकर – भारताचे ७वे सरन्यायाधीश – पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१)
  • १९७८: गुओ मोरुओ – चिनी कवी, लेखक आणि इतिहासकार
  • १९६४: कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ (जन्म: ५ जानेवारी १८९२)
  • १९१२: फ्रेडरिक पासी – फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: २० मे १८२२)