दिनविशेष, १२ मे; जागतिक परिचारिका दिन

  १२ मे घटना

  • २०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९८: केन्द्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.
  • १९८७: ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.
  • १९६५: सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.
  • १९५५: दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
  • १९४१: बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z सादर केले.
  • १९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
  • १७९७: नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
  • १६६६: आग्रा शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
  • १५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.
  • १३६४: पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.

  १२ मे जन्म

  • १९३०: राधाकृष्ण हरिराम तहिलियानी – भारतीय नौसेनाधिपती (निधन: १४ ऑक्टोबर २०१५)
  • १९०७: विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (निधन: १७ ऑक्टोबर १९९३)
  • १९०७: कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री (निधन: २९ जून २००३)
  • १९०५: आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत – पद्मश्री
  • १८९५: जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (निधन: १७ फेब्रुवारी १९८६)
  • १८६३: उपेंद्रकिशोर रे – भारतीय चित्रकार आणि संगीतकार (निधन: २० डिसेंबर १९१५)
  • १८२०: फ्लॉरेंन्स नाईटिगेल – परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक (निधन: १३ ऑगस्ट १९१०)

  १२ मे निधन

  • २०१४: शरत पुजारी – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक (जन्म: ८ ऑगस्ट १९३४)
  • २०१३: बी. बिक्रम सिंग – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २६ मे १९३८)
  • २०१०: तारा वनारसे (रिचर्डस) – लेखिका
  • १९७०: नोली सॅच – जर्मन कवी आणि नाटककार (जन्म: १० डिसेंबर १८९१)