दिनविशेष, १३ जून ; १९६९ साली विनोदी लेखक, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, राजकारणी प्रल्हाद केशव अत्रे यांचं निधन झाले

    १३ जून घटना

    • २०००: विश्वनाथन आनंद – स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.
    • १९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.
    • १९८३: पायोनियर १० – हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
    • १९७८: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.
    • १९५६: पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
    • १९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.
    • १९३४: व्हेनिसमध्ये ऍडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.
    • १८८६: कॅनडा – देशातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.

    १३ जून जन्म

    • १९६५: मनिंदर सिंग – भारतीय क्रिकेटपटू
    • १९३७: आंद्रेस व्हिटॅम स्मिथ – द इंडिपेंडंटचे सहसंस्थापक
    • १९२८: जॉन फोर्ब्स नॅश ज्युनियर – अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: २३ मे २०१५)
    • १९२३: प्रेम धवन – गीतकार – पद्मश्री (निधन: ७ मे २००१)
    • १९०९: इ. एम. एस. नंबूदिरिपाद – केरळचे १ले मुख्यमंत्री (निधन: १९ मार्च १९९८)
    • १९०५: कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू (निधन: ५ डिसेंबर १९५९)
    • १८७९: बाबाराव सावरकर – अभिनव भारत संघटनेचे संस्थापक (निधन: १६ मार्च १९४५)
    • १८३१: जेम्सक्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ (निधन: ५ नोव्हेंबर १८७९)
    • १८२२: कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (निधन: ११ मार्च १८९४)

    १३ जून निधन

    • २०२०: वसंत नायसादराय रायजी – भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार (जन्म: २६ जानेवारी १९२०)
    • २०१३: डेव्हिड ड्यूईश – ड्यूईश इंक. कंपनीचे संस्थापक
    • २०१२: मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट (जन्म: १८ जुलै १९२७)
    • १९६९: प्रल्हाद केशव अत्रे – विनोदी लेखक, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, राजकारणी (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
    • १९६७: विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार – पद्मश्री (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)