दिनविशेष, १३ मे; १९५२ साली भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले

  १३ मे घटना

  • २०००: उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
  • १९९८: भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण केली.
  • १९९६: ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
  • १९९५: ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.
  • १९७०: नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
  • १९६७: डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
  • १९६२: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न.
  • १९५२: भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
  • १९५०: फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस सिल्व्हरस्टोन झाली.
  • १९३९: अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.
  • १८८०: थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.

  १३ मे जन्म – दिनविशेष

  • १९८४: बेनी दयाल – भारतीय गायक
  • १९७३: संदीप खरे – गीतलेखक, कवी
  • १९५६: कैलाश विजयवर्गीय – भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस
  • १९५१: आनंद मोडक – भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक
  • १९१६: सच्चिदानंद राऊत – भारतीय उडिया भाषा कवी (निधन: २१ ऑगस्ट २००४)
  • १९०५: फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती (निधन: ११ फेब्रुवारी १९७७)
  • १८५७: सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुं शोधणारे शास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (निधन: १६ सप्टेंबर १९३२)

  १३ मे निधन

  • २०१३: जगदीश माळी – भारतीय छायाचित्रकार
  • २०१०: विनायक कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक (जन्म: ७ ऑक्टोबर १९१७)
  • २००१: आर. के. नारायण – लेखक (जन्म: १० ऑक्टोबर १९०६)
  • १९५०: देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक (जन्म: १९ नोव्हेंबर १८७५)
  • १९०३: अपोलिनेरियो माबिनी – फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान (जन्म: २३ जुलै १८६४)
  • १६२६: मलिक अंबर – अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण