दिनविशेष, १४ मे; १९४० साली दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली

  १४ मे घटना

  • १९९७: इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना – देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची सुरुवात नोंदणी झाली.
  • १९६३: कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
  • १९६०: एअर इंडिया – कंपनीची मुंबई ते न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
  • १९५५: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा झाला.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  • १७९६: देवीची लस – इंग्लंडच्या जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.

   

  १४ मे जन्म

  • १९९८: तरुणी सचदेव – लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार (निधन: १४ मे २०१२)
  • १९८४: मार्क झुकरबर्ग – फेसबुकचे सहसंस्थापक
  • १९८१: प्रणव मिस्त्री – भारतीय संगणक शास्त्रज्ञ
  • १९२६: डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (निधन: ८ फेब्रुवारी १९९९)
  • १९२२: फ्रांजो तुुममन – क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १० डिसेंबर १९९९)
  • १९०९: वसंत शिंदे – विनोदसम्राट – कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार (निधन: ४ जुलै १९९९)
  • १८९८: हेस्टिंग्ज बांदा – मलावी देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: २५ नोव्हेंबर १९९७)
  • १६५७: छत्रपती संभाजी महाराज – मराठा साम्राज्याचे २रे छत्रपती (निधन: ११ मार्च १६८९)

   

  १४ मे निधन

  • २०१३: असगर अली इंजिनिअर – भारतीय लेखक (जन्म: १० मार्च १९३९)
  • २०१२: तरुणी सचदेव – लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार (जन्म: १४ मे १९९८)
  • १९९८: फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (जन्म: १२ डिसेंबर १९१५)
  • १९७८: जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक (जन्म: १६ जुलै १९१७)
  • १९६३: डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ राजकीय नेते (जन्म: ३० डिसेंबर १९०२)
  • १९२३: सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक (जन्म: २ डिसेंबर १८५५)
  • १८७९: हेन्री सिवेल – न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ७ सप्टेंबर १८०७)
  • १६४३: लुई (१३वा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ सप्टेंबर १६०१)