दिनविशेष, २१ जून; २०१५ साली जागतिक योग दिनाची सुरवात झाली

    २१ जून घटना

    • २०१५: जागतिक योग दिनाची सुरवात.
    • २००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.
    • १९९९: मार्क वॉ – हे विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारे ४थे खेळाडू ठरले.
    • १९९८: फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.
    • १९९५: रश्मी मयूर – यांना पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
    • १९९२: डॉ. रघुनाथ माशेलकर – यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.
    • १९९१: पी. व्ही. नरसिम्हा राव – भारताचे ९वे पंतप्रधान बनले.
    • १९८९: अमेरिका – सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
    • १९६१: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.
    • १९५७: एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
    • १९४९: राजस्थान उच्च न्यायालय – स्थापना.
    • १९४८: चक्रवर्ती राजगोपालाचारी – पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.
    • १८९८: अमेरिका – देशाने स्पेनकडून ग्वाम हा प्रांत ताब्यात घेतला.
    • १७८८: अमेरिका – न्यू हॅम्पशायर ९वे राज्य बनले.

     

    २१ जून जन्म

    • १९६७: पियरे ओमिदार – ईबे (eBay)चे स्थापक
    • १९५३: बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या १३व्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान (निधन: २७ डिसेंबर २००७)
    • १९५३: बेनझीर भुट्टो – पाकिस्तानच्या पंतप्रधान
    • १९५२: जेरमी कोनी – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
    • १९४१: अलॉयसियस पॉल डिसोझा – भारतीय बिशप
    • १९२३: सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक
    • १९१६: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९वे नौदल प्रमुख (निधन: २१ जानेवारी १९९८)
    • १९१२: विष्णू प्रभाकर – भारतीय लेखक व नाटककार (निधन: ११ एप्रिल २००९)
    • १७८१: सिमिओन-डेनिसपॉइसॉन – फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

     

    २१ जून निधन

    • २०२०: राजिंदर गोयल – भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे (जन्म: २० सप्टेंबर १९४२)
    • २०२०: जीत सिंग नेगी – आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक (जन्म: २ फेब्रुवारी १९२५)
    • २०१२: सुनील जना – भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार (जन्म: १७ एप्रिल १९१८)
    • २०१२: भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७)
    • २००३: लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)
    • १९८४: अरुण सरनाईक – मराठी चित्रपट अभिनेते, संगीतकार (जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)
    • १९५७: योहानेस श्टार्क – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक
    • १९४०: केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म: १ एप्रिल १८८९)
    • १९२८: द्वारकानाथ पितळे – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार (जन्म: ३ एप्रिल १८८२)
    • १८९३: लिलँड स्टॅनफोर्ड – अमेरिकन उद्योगपती, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक
    • १८९३: अमासा लेलंड स्टॅनफर्ड – अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक (जन्म: ९ मार्च १८२४)
    • १८७४: अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम – स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ