उद्या कार्तिकी एकादशी; या एका उपायाने घरात येईल सुख समृद्धी

आपण एक शुद्ध तुपाचा दिवा आपण तुळशीजवळ जाऊन प्रज्वलित करावा. त्यानंतर देवी लक्ष्मी आणि विष्णुदेव यांना नमस्कार करावा तसेच तुळस मातेला देखील वंदन करावे.

    १४ नोव्हेंबरला रविवारी एकादशी आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कार्तिकी एकादशी (kartiki ekadashi)देवउठी एकादशी किंवा प्रभोधनी एकादशी असे म्हणटले जाते. आषाढ महिन्यातील आषाढी किंवा देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवउठी एकादशीपर्यंत विष्णू भगवंत निद्रा अवस्थेत असतात. ते देवउठी एकादशीला जागे होतात. आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव करतात.

    ज्यावेळी भगवंत निद्राअवस्थेत असतात त्यावेळी कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत. आणि भगवंत जागृत अवस्थतेत आले की सर्व शुभ कार्यांचा प्रारंभ केला जातो. या वर्षी १४ व १५ नोव्हेंबर या दोन दिवशी तिथी येत असल्याने संसारी व्यक्तींनी १४ नोव्हेंबर रविवारची एकादशी करावी तर साधूजणांनी तसेच सन्यासी लोकांनी १५ नोवेंबर दिवशी एकादशीचे व्रत करावे. एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय करतो ते खूपच प्रभावी असतात. जेणेकरून माता लक्ष्मी व विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात.

    शास्त्रात एकादशीच्या दिवशी करण्याचा एक अचूक उपाय सांगितला जातो. हा उपाय केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होतो. हा उपाय आपल्याला १४ नोव्हेंबर च्या रात्री करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी स्वच्छ स्नान करून घ्यावे व लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करावीत. आपलीकडे लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे नसतील तर काळ्या रंगाची सोडून बाकी कोणत्याही रंगाची वस्त्रे आपण परिधान करू शकतात.

    त्यानंतर आपण एक शुद्ध तुपाचा दिवा आपण तुळशीजवळ जाऊन प्रज्वलित करावा. त्यानंतर देवी लक्ष्मी आणि विष्णुदेव यांना नमस्कार करावा तसेच तुळस मातेला देखील वंदन करावे. त्यानंतर श्री हरी विष्णूंचा मंत्र म्हणता म्हणता. तुळशीमातेला ११ प्रदक्षणा घालाव्यात. मंत्र आहे, ओम नमो भगवते वायुदेवाय नमः । प्रदिक्षणा आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे करायच्या आहेत.

    प्रदिक्षणा झाल्यानंतर आपण ओम नमो भगवते वायुदेवाय नमः । या मंत्राचा १०८ वेळा पुन्हा जप करायचा आहे. त्यानंतर आपण तुळस मातेला नमस्कार करावा. व श्री हरी विष्णू व देवी लक्ष्मीला वंदन करावे. हा उपाय करताना काही गोष्टींचे भान ठेवावे. जसे कि तुळशीला स्पर्श होणार नाही कारण संध्यकाळ झाल्यानंतर तुळशीला स्पर्श करणे वर्ज मानले जाते. एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत.

    जर तुमचे व्रत नसेल तरी या दिवशी तांदूळ लसूण कांदे या गोष्टी खाऊ नयेत. तसेच तामसिक पदार्थ, धूम्रपान, मद्यपान देखील करू नये. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये. एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यास आपल्यावरती विष्णूदेवांची व लक्ष्मी मातेची कृपा होते. घरातील गरिबीचा नाश होतो. घरात सुख समृद्धी येते. घरात धनधान्याची कमतरता राहत नाही.

    टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही.