विमान टेक ऑफ आणि लैंडिंगच्या वेळी विमानाच्या खिडक्यांचे पडदे उघडे ठेवण्यास का सांगतात?

लँडिंग किंवा टेक ऑफच्या वेळी अपघात उद्भवल्यास आणि अश्या वेळी खिडक्यांचे पडदे बंद असल्यास आणि आपल्याला ते उघडावे लागल्यास आपल्या डोळ्यांना त्या प्रकाश/ काळोखाच्या तीव्रतेचा सामना करता यावा आणि...

    विमानातून प्रवास करणाऱ्या किंवा भविष्यात जे लोकं प्रवास करणार आहेत अश्या सर्वांसाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.ज्यांनी विमानातून प्रवास केला आहे त्यांना माहीत असेलच की टेक ऑफ आणि लँडिंगच्या (take off and landing) आधी विमानातील लाईट थोडीशी डीम केलेली असते. तर साधारणपणे जेव्हा आपण विमानातून दिवसा/ रात्री प्रवास करतो तेव्हा आपले डोळे हे त्यावेळी बाहेर असलेल्या प्रकाश किंवा काळोखाच्या तीव्रतेचा सामना करायला सज्ज असतात. एका निष्कर्षानुसार आजमितीस जगभरात विमानाचे जेव्हढे अपघाताचे वा अपघात होऊ शकले असते असे प्रसंग घडले आहेत.

    त्यापैकी साधारण ८०% प्रसंग हे टेक ऑफ पासून ०-३ मिनिटात किंवा लँडिंग च्या ८-० मिनिटे आधी घडले आहेत.आपला प्रवास सुरू झाल्यापासून किंवा संपेपर्यंत, प्रकाश/काळोखाची तीव्रता कमी जास्त होण्याची शक्यता असते. तर लँडिंग किंवा टेक ऑफच्या वेळी अपघात उद्भवल्यास आणि अश्या वेळी खिडक्यांचे पडदे बंद असल्यास आणि आपल्याला ते उघडावे लागल्यास आपल्या डोळ्यांना त्या प्रकाश/ काळोखाच्या तीव्रतेचा सामना करता यावा आणि आपल्यासमोर आलेल्या प्रसंगाचा आपल्याला गोंधळून न जाता सामना करता यावा आणि बाहेर असलेली परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेता यावा म्हणून आपल्याला विमान टेक ऑफ आणि लँडिंग च्या वेळी खिडक्यांचे पडदे उघडे ठेवण्यास सांगतात.

    याशिवाय एखाद्या वेळी विमानात किंवा इंजिनला आग लागल्यास केबिन क्रू ला प्रवाशांची लवकरात लवकर सुटका होण्यास योग्य मार्ग निवडण्यासाठी दिसावे, फायर ब्रिगेडला त्वरित मदत करता यावी किंवा विमानाचे अपहरण झाले असल्यास विमानातील परिस्थिती बाहेरील लोकांना समजता यावी यासाठी देखील खिडक्यांचे पडदे उघडे ठेवतात.