भारतातल्या ‘या’ मंदिरात दर्शन घेण्यासाठी पुरुषांना नेसावी लागते साडी; केसांत माळावा लागतो गजरा आणि ओठांवर लावावी लागते लिपस्टिक

पुरुष केवळ साड्याच परिधान करत नाहीत तर त्यांच्या केसांमध्ये गजरा आणि लिपस्टिक देखील लावतात. पूर्णपणे सुशोभित झाल्यानंतरच त्यांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी आहे...

  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देश जरी झपाट्याने प्रगती करत असला तरी अनेक प्राचीन रूढी परंपरा इथे कायम आहे आणि त्या काटेकोरपणे पाळल्याही जातात. भारतात  अशी अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत जी आपल्या पुरातन परंपरासाठी ओळखली जातात. एखाद्या मंदिरातील देवता दारू पितात तर काही मंदिरात उंदरांना दूध प्रसाद म्हणून दिले जाते आणि त्यानंतर दूध भक्तांमध्ये वितरीत केले जाते. Men have to wear sari to visit this temple in India 

  अशीही काही मंदिरांची परंपरा आहे जिथे महिलांना मंदिरात प्रवेश देखील दिला जात नाही. आज अशाच एका अनोख्या मंदिराबद्दल आपण जाणून घेणार आहोत जेथे पुरुषांना कपडे बदलून आत जावे लागते.

  होय… दक्षिण भारतात केरळमध्ये एक मंदिर आहे, जे आपल्या खास परंपरेसाठी ओळखले जाते. देशभरात कोत्तानकुलांगरा देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराला पुरुषांना प्रवेश करण्याची परवानगी नाही.

   

  परंतु जर त्यांना आत जायचे असेल तर एक अनोखी परंपरा पाळावी लागते, जी शतकानुशतके चालू आहे. पुरुशांनी या परंपरेचे पालन केले तर त्यांना मंदिरात प्रवेश मिळतो.

  केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील या मंदिरात पुरुषांना बंदी घालण्यात आली आहे. वास्तविक या मंदिराची प्रथाच आहे की तिथे केवळ महिलाच जाऊ शकतात.

  जर पुरुष गेले तर त्यांना महिलांचे कपडे घालावे लागतात. इतकेच नाही तर महिलांप्रमाणेच पुरुषांनाही मेकअप करावा लागेल. जर पुरुष असे करत नाहीत तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नाही.

   

  हे आहे कारण 

  या मंदिरात पुरुष प्रवेश न करण्यामागे एक प्रसिद्ध आख्यायिका आहे. असा विश्वास आहे की, जेव्हा काही मेंढपाळांनी प्रथम येथे स्थित देवीची मुर्ती पाहिली तेव्हा त्यांनी महिलांचे कपडे परिधान करून दगडावर फुले वाहिली, त्यानंतर त्या दगडातून दैवी शक्ती येऊ लागली.

  यानंतर हे मंदिर बांधले गेले. असेही सांगण्यात येते की, काही लोक दगडावर नारळ फोडत होते आणि या वेळी दगडामधून रक्त येऊ लागले. त्यानंतर येथे पूजा सुरू झाली.

  असे म्हणतात की या मंदिरात स्वतः देवीची मूर्ती प्रकट झाली होती. जगातील आपल्या अनोख्या श्रद्धेसाठी ओळखल्या जाणार्‍या या मंदिराला छप्पर किंवा कळस नाही. या राज्यातील हे एकमेव मंदिर आहे ज्यास गर्भगृहावर छप्पर किंवा कळस नाही.

  पुरुषांसाठी डिझाइन केलेले मेकअप रूम

  या मंदिरात दरवर्षी भाविकांची गर्दी दिसून येते. पोंगल सणाला एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या उत्सवात पुरुष भाविक येतात. त्यांच्या तयारीसाठी मंदिरात स्वतंत्र मेक-अप कक्ष बनविला गेला आहे. यामध्ये पुरुष केवळ साड्याच परिधान करत नाहीत तर त्यांच्या केसांमध्ये गजरा आणि लिपस्टिक देखील लावतात. पूर्णपणे सुशोभित झाल्यानंतरच त्यांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी आहे. मंदिरात पूजेसाठी ट्रा’न्सजें’डरसुद्धा येतात.