मुंबई शहर जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ‘सहल मुंबईची’ ॲप

मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या या ॲपबाबत पालकमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. या पर्यटन विषयक मोबाईल ॲपचा लाभ, पर्यटक, विद्यार्थी, अभ्यासक यांना निश्चित होईल आणि मुंबई शहर जिल्हा पर्यटन विकासाला चालना मिळेल, असे विश्वास मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.

    मुंबई : जागतिक पर्यटन दिनानिमित्त (World Tourist Day) जिल्हाधिकारी मुंबई शहर (Mumbai City) यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्णतेने तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन मोबाईल ॲपच्या (Online Mobile App) प्रसिद्धीची सुरूवात मुंबई शहर पालकमंत्री तथा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आली.

    मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या ‘सहल मुंबईची’ (Sahal Mumbaichi) ॲपबाबत पालकमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. या पर्यटन विषयक मोबाईल ॲपचा लाभ, पर्यटक, विद्यार्थी, अभ्यासक यांना निश्चित होईल आणि मुंबई शहर जिल्हा पर्यटन विकासाला चालना मिळेल, असे विश्वास मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.

    पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा संबंधित यंत्रणा प्रमुखांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, कौशल्य विकास कार्यक्रम, पायाभूत सुविधा तसेच पर्यटन व मत्स्य विकास या योजनांचा आढावा घेण्यात आला. या सर्व योजनांचे सविस्तर सादरीकरण जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी केले. जिल्हा नियोजन मंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक नूतन समिती गठीत करून घेण्यात यावी, असे केसरकर यांनी निर्देशित केले.

    यावेळी हाजी अली विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार हाजी अली विकास आराखडा आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात आवश्यक विविध सुधारणांबाबत प्राथम्याने कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्री केसरकर यांनी सूचना केल्या.