पुस्तकाला आहे चक्क मानवी त्वचेचे आवरण; त्यामागचे कारणही आहे तितकेच अनोखे!

या पुस्तकाला चक्क मानवी त्वचेचे आवरण घालण्यात आले होते. या पुस्तकात एका महिलेच्या पाठीची त्वचा लावल्याचे आढळून आले. हे पुस्तक असे का बनविण्यात आले याचे कारण शोधण्याचा प्रय▪केल्यावर ते आत्मा व मृत्यूनंतरच्या जीवनावर आधारित असल्याचे दिसून आले.

    हार्वर्ड विद्यापीठात एक अनोखे पुस्तक आहे. ज्यांनी कुणी हे पुस्तक पाहिले ते सगळेच थक्क होतात. या पुस्तकाचे स्वरूप कोणत्याही सामान्य पुस्तकापेक्षा एकदम निराळे आहे. या पुस्तकास घातलेले आवरण पुठ्ठय़ासारखे दिसत असले तरी ते अतिशय मऊ व हळूवार होते. अधिक न्याहाळून पाहिल्यास ते वेगळेच वाटते. त्याबाबत जाणून घेण्यासाठी हे पुस्तक तपासणीसाठी पाठविले असता त्यातून वेगळेच वास्तव समोर अले.

    या पुस्तकाला चक्क मानवी त्वचेचे आवरण घालण्यात आले होते. या पुस्तकात एका महिलेच्या पाठीची त्वचा लावल्याचे आढळून आले. हे पुस्तक असे का बनविण्यात आले याचे कारण शोधण्याचा प्रय▪केल्यावर ते आत्मा व मृत्यूनंतरच्या जीवनावर आधारित असल्याचे दिसून आले. हे अद्भूत पुस्तक व्यक्तीच्या मृत्यूनंतरची गोष्ट सांगते. १९व्या शतकातील फ्रेंच लेखक हुजे यांनी हे पुस्तक लिहिले होते.

    हुजे यांनी हे पुस्तक लिहिल्यानंतर आपला मित्र डॉ. लुडोविकला भेट म्हणून दिले होते. पुस्तक वाचल्यावर त्यातील विषयानुसार त्याला आवरण घालण्याचा निर्णय लुडोविकने घेतला. या प्राचीन पुस्तकावर मानवी घातलेले मानवी त्वचेचे आवपण आजच्या काळातील लोकांना वेगळे वाटत असले तरी जुन्या जमान्यातील लोक अशाच प्रकारे पुस्तकांना जपत असत. त्याकाळी ही सामान्य बाब होती, असे संशोधक सांगतात.